स्टँडअप कॉमेडिअन कुणाल कामरावर इंडिगोनं सहा महिन्यांची, एअर इंडियानं अनिश्चित काळासाठी बंदी घातली आहे. पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्याबरोबर चुकीचं वर्तन केल्याचं कारण देत दोन्ही कंपन्यांनी हा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचं केंद्रीय हवाई वाहतूक मंत्र्यांनीही समर्थन केलं आहे. विमान कंपन्यांच्या निर्णयावर नेटकरी संतापले आहेत. कुणालवर बंदी घातली, मग खासदार साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांच्यावर का नाही? असा सवाल सोशल मीडियातून उपस्थित केला जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबईहून लखनौला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात कॉमेडिअन कुणाल कामरानं पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. हा व्हिडीओ कुणाल कामरानं ट्विट केला होता. दरम्यान, कुणाल कामरानं अर्णब गोस्वामी यांच्याबरोबर चुकीचं वर्तन केल्याचा ठपका ठेवत इंडिगोनं कामरा याच्यावर सहा महिन्यासाठी प्रवास बंदी घातली आहे. इंडिगोबरोबरच एअर इंडियानंही कुणाल कामरावर अनिश्चित काळासाठी बंदी घातली असून, त्यावरून घमासान चर्चा सुरू झाली आहे. कुणाल कामराविरोधात दोन्ही विमान कंपन्यांनी कारवाई केल्याच्या निर्णयावर सोशल मीडियामध्ये टीका सुरू झाली आहे. सोशल मीडियात काही नेटकऱ्यांनी खासदार साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांचं उदाहरण दिलं आहे.

सोशल मीडियातून काय होतेय टीका?

कुणाल कामरावर बंदी घातली, मग साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांच्यावर का बंदी घालण्यात आली नाही, असं अनेक नेटकऱ्यांनं म्हटलं आहे. त्याचबरोबर सानिया नावाच्या महिलेनंही इंडिगोच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. “स्पाईस जेटनं प्रज्ञा सिंग ठाकूर यांच्यावरही अशीच कारवाई केली का? त्यांच्या चुकीच्या वर्तनामुळे विमानाला विमानाला ४५ मिनिटं विलंब झाला होता. माझ्या मते त्यांचं वर्तन जास्त अस्वीकारार्ह आहे,” असं म्हटलं आहे.
सलील त्रिपाठी नावाच्या व्यक्तीनं थेट केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री पुरी यांना प्रश्न विचारला आहे. त्रिपाठी यांनी खासदार प्रज्ञा सिंग ठाकूर आणि आणखी एका व्यक्तीचा विमानात वाद घालताना फोटो शेअर केला आहे. “विमानात गोंधळ घालणाऱ्या या प्रवाशांविरोधात कारवाई केली का?,” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

आणखी वाचा – ‘अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का’, विमान प्रवास बंदीनंतर कुणाल कामराची प्रतिक्रिया

साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांनी काय केलं होतं ?

डिसेंबरमध्ये दिल्लीहून भोपाळला जात असताना स्पाईस जेटच्या विमानात खासदार प्रज्ञा सिंग ठाकूर यांनी विमानातील कर्मचाऱ्यांशी सीटवरून वाद घातला होता. ४५ मिनिटांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. याबद्दल त्यांनी संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांकडेही तक्रार केली होती.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why not pragya thakur questions twitter after indigo and air india ban kunal kamra bmh
First published on: 29-01-2020 at 13:14 IST