जागतिक राजकारणात रशिया हा अमेरिकेचा पारंपारिक विरोधक समजला जातो. आतापर्यंत वेगवेगळया जागतिक मुद्दांवर रशियाने नेहमीच अमेरिकेच्या विरोधात भूमिका घेतली आहे. त्यामुळे अन्य देशसुद्धा या दोन देशांच्या गटात विभागले गेले. अलीकडे अमेरिकेच्या विरोधकाच्या यादीमध्ये चीनचाही समावेश झाला आहे. आतापर्यंत वेगवेगळया जागतिक मुद्दांवर अमेरिकेचा सामना करण्यासाठी रशिया आणि चीन हे देश एकत्रित दिसले आहेत.

अमेरिकेविरोधात चीनला बळकट करण्यासाठी रशियाने त्यांना घातक शस्त्रास्त्रांचा सुद्धा पुरवठा केला. समान विरोधक असल्यामुळे रशिया आणि चीन एकत्र आले. पण भविष्यात हे चित्र बदलेले दिसू शकते. रशियाने चीनला देण्यात येणाऱ्या S-400 मिसाइल सिस्टिमच्या पुरवठयाला स्थगिती दिली आहे. हा निर्णय भविष्यात चीन-रशिया संबंध बदलाचे संकेत ठरु शकतो.

आणखी वाचा- Ban China Products: ३७१ दर्जाहीन चिनी वस्तूंवर बंदीचा बडगा

कारण मैत्रीच्या आडून चीनने रशिया बरोबरही विश्वासघात केला आहे. मागच्या काही वर्षात चीन आणि रशियामध्ये चांगेल मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित झाले. दोन्ही देशांमध्ये मोठया प्रमाणावर व्यापार सुरु झाला. रशियाने आपल्या अत्याधुनिक शस्त्रास्त्रांची विक्री सुद्धा चीनला केली. पण आता चीनने रशियामध्येच हेरगिरी केल्याचे समोर आले आहे.

आणखी वाचा- चीनवर दुसऱ्यांदा ‘डिजिटल स्ट्राइक’! भारत सरकारने अजून 47 अ‍ॅप्स केले Ban

काही दिवसांपूर्वी रशियन यंत्रणेने व्हॅलरी मितको यांना पकडले. ते सेंट पीटर्सबर्ग आर्कटिक सोशल सायसेस अकादमीचे अध्यक्ष आहेत. रशियाशी संबंधित असलेली गोपनीय कागदपत्रे चिनी गुप्तचर यंत्रणेला दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.. तासने हे वृत्त दिले आहे. या घटनेनंतरच रशियाने S-400 च्या पुरवठयाला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे रशियाच्या या निर्णयामागे चीनची हेरगिरी सुद्धा एक कारण असू शकते.