News Flash

“माफी मागणार नाही”, राहुल गांधींनी खडसावल्यानंतरही कमलनाथ निर्णयावर ठाम

महिला नेत्याचा 'आयटम' उल्लेख केल्याने वाद निर्माण झाला आहे

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कलमनाथ यांनी महिला नेत्याचा आक्षेपार्ह उल्लेख केल्याने वाद निर्माण झाला आहे. कललनाथ यांनी याप्रकरणी दिलगिरी व्यक्त केली आहे. दरम्यान राहुल गांधी यांनी कमलनाथ यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना आपल्याला त्यांची भाषा अजिबात आवडली नसल्याचं म्हटलं आहे. दुसरीकडे राहुल गांधी यांनी खडसावल्यानंतरही कमलनाथ यांनी मात्र माफी न मागण्याच्या निर्णयावर आपण ठाम असल्याचं म्हटलं आहे.

राहुल गांधी यांनी काय म्हटलं आहे –
“कमलनाथ माझ्या पक्षातील आहेत, पण मला त्यांनी वापरलेली भाषा अजिबात आवडलेली नाही. ते कोण आहेत यामुळे फरक पडत नाही, पण मी अजिबात त्याचं समर्थन करणार नाही. हे दुर्दैवी आहे,” अशी प्रतिक्रिया राहुल गांधींनी दिली आहे.

आणखी वाचा- आयटम! कमलनाथ यांच्या वक्तव्यावर राहुल गांधींनी सोडलं मौन; म्हणाले

कमलनाथ यांनी काय सांगितलं –
राहुल गांधींच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना कमलनाथ यांनी म्हटलं आहे की, “हे राहुल गांधींचं मत आहे. ते वक्तव्य का केलं यासंबंधी स्पष्टीकरण मी दिलं आहे. ते वक्तव्य करताना काय संदर्भ होता याचं स्पष्टीकरण मी दिलं आहे. त्यात अजून काही सांगण्याचं कारण नाही”. कमलनाथ यांना यावेळी इमरती देवी यांची माफी मागणार का असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “जर माझा कोणाचाही अपमान करण्याचा हेतू नव्हता तर माफी का मागावी. जर कोणाला अपमानित वाटत असेल तर मी आधीच दिलगिरी व्यक्त केली आहे”.

आणखी वाचा- सरळ सरळ माफी का मागत नाहीत; मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचा सवाल

ग्वाल्हेरच्या डबरा मतदारसंघात भाजपने इमरती देवी यांना उभे केले आहे. येथील काँग्रेस उमेदवार हे साधे असून, इमरती देवी यांच्यासारखे ‘आयटम’ नाहीत, असे वक्तव्य रविवारी येथे एका निवडणूक प्रचारसभेतील भाषणात कमलनाथ यांनी केले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 20, 2020 3:34 pm

Web Title: why should i apologise when i did not intend to insult anyone asks kamalnath over item statement sgy 87
Next Stories
1 आयटम! कमलनाथ यांच्या वक्तव्यावर राहुल गांधींनी सोडलं मौन; म्हणाले
2 येडियुरप्पांचं मुख्यमंत्रीपद धोक्यात; मोदींनी बदलाचे संकेत दिल्याचा भाजपा आमदाराचा गौप्यस्फोट
3 सरळ सरळ माफी का मागत नाहीत; मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचा सवाल
Just Now!
X