News Flash

करोना लसीसाठी सुमारे एक वर्ष वाट पाहावी लागणार : WHO

जगभरात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

जगभरात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अमेरिका, ब्राझील, भारत यांसारख्या देशांना करोनाचा मोठा फटकाही बसला आहे. करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी अनेक देश युद्धपातळीवर लस विकसित करण्याचे प्रयत्न करत आहेत. अशातच जागतिक आरोग्य संघटनेनं एक मोठं वक्तव्य केलं आहे. करोनाची लस येण्यासाठी २०२१ चा मध्य उजाडेल अशी शक्यता जागतिक आरोग्य संघटनेनं व्यक्त केली आहे. २०२१ च्या मध्यापर्यंत व्यापक स्वरूपात लसीकरण शक्य नसल्याचं डब्ल्यूएचओच्या प्रवक्त्यांनी म्हटलं आहे. २०० पेक्षा अधिक देशांना करोनाचा फटका बसला आहे. तर सर्वंच देश करोना नियंत्रणात आणण्यासाठी लसीची वाट पाहत आहेत. परंतु मोठ्या प्रमाणात लसीचं उत्पादन आणि वितरण हे एक मोठं आव्हान आहे. यामुळे गरीब देशांना अधिक संकटाचा सामना करावा लागू शकतो, अशी भीतीही जागतिक आरोग्य संघटनेनं व्यक्त केली.

“पुढील वर्षाच्या मध्यापूर्वी जगभरात व्यापक स्वरूपात करोना लसीच्या उपलब्धतेची आपण अपेक्षा करू शकत नाही. करोना लसीच्या चाचणीचा तिसरा टप्पा हा मोठा असेल. ही लस किती सुरक्षित ठेवते आणि लस किती सुरक्षित आहे हे पाहण्याची अधिक गरज असल्याचं मत,” जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रवक्त्या मार्गरेट हॅरिस यांनी व्यक्त केलं.  जेनेव्हामध्ये एका ब्रिफिंगदरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना यावर भाष्य केलं.

जगभरातील जवळपास ७६ देशा आता जागतिक आरोग्य संघटनेच्या सह-नेतृत्वाखालील जागतिक करोना लस वाटप योजनेत सहभागी होण्यास कटिबद्ध आहेत. याचा उद्देश लस खरेदी करण्यास आणि त्याचं वितरण करण्यास मदत करणं हा आहे. या योजनेशी जोडलेल्या एका व्यक्तीनं बुधवारी यासंदर्भातील माहिती दिली.

सध्या आमच्याकडे ७६ देशांनी लसीची खेदी करण्यासाठी आपल्या जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी विचारणा केली आहे. ही संख्या पुढील काळात वाढेल अशी अपेक्षा करतो. ही एक चांगली बाब असल्याचं असं मत गॅवी वॅक्सिनते मुख्य कार्यकारी अधिकारी बर्केले यांनी रॉयटर्सशी बोलताना व्यक्त केलं. कोवॅक्सच्या समन्वयकांची चीनसोबत यात सहभागी होण्यासाठी चर्चा सुरू आहे. आम्ही यासंदर्भात चीन सरकारशी चर्चा केली. सध्या यासंदर्भात कोणताही करार झाला नाही. परंतु त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचंही त्यांनी सांगितलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 4, 2020 5:42 pm

Web Title: widespread covid 19 vaccines not expected until mid 2021 says who coronavirus jud 87
Next Stories
1 चीनचं सुखोई-३५ विमान पडलं का?; तैवानच्या संरक्षण मंत्रालयाकडून स्पष्टीकरण, म्हणाले…
2 “सरकारच्या उपाययोजनांमुळे अर्थव्यवस्था पुन्हा गतिमान होईल”
3 राहुल गांधी ‘रागा’वले, विकास गायब आहे म्हणत पोस्ट केली यादी…
Just Now!
X