नवऱ्याने त्याच्या मोबाईलचा पासवर्ड सांगितला नाही म्हणून बायकोने नवऱ्याला जिवंत जाळले. इंडोनेशियाच्या ईस्ट लोमबोक रिजन्सी भागात ही धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली आहे. गंभीररित्या भाजलेल्या नवऱ्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मिड डे ने दिलेल्या वृत्तानुसार डेडी पुरनामा (२५) घरात काम करत असताना पत्नी इल्हान अयानीने (२५) त्याच्याकडे मोबाईलचा पासवर्ड मागितला. डे़डीने पासवर्ड देण्यास नकार दिल्यानंतर दोघांमध्ये वादावादी सुरु झाली. डेडी पुरनामाने इल्हानला मारहाण केली. नवऱ्याने आपल्यावर हात उचलला हे इल्हानला अजिबात सहन झाले नाही.

तिने रागाच्या भरात पेट्रोल आणून ते डेडीच्या अंगावर टाकले व लायटरने त्याला पेटवून दिले. शेजाऱ्यांनी आगीच्या ज्वाळा पाहिल्यानंतर ते डेडीच्या मदतीला धावून आले. कशीबशी आग विझवून ते डेडी पुरनामाला जवळच्या रुग्णालयात घेऊन गेले. आगीत गंभीररित्या भाजलेल्या डेडीचा उपचारा दरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. इल्हान पोलिसांच्या ताब्यात असून तिने इतके टोकाचे पाऊल उचलण्यामागे आणखी कोणता हेतू होता का ? त्या दिशेने पोलीस तपास करत आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wife burns husband alive after he refuses to share mobile password
First published on: 24-01-2019 at 02:02 IST