27 September 2020

News Flash

बायकोला मटण बनवायला उशीर झाला, नवऱ्याने केली चार वर्षाच्या मुलीची हत्या

बायकोने मटण बनवायला उशीर केला म्हणून संतापलेल्या नवऱ्याने पोटच्या चार वर्षाच्या मुलीला बेदम मारहाण केली. या मारहाणीत मुलीचा मृत्यू झाला आहे.

प्रतिनिधिक छायाचित्र

बायकोने मटण बनवायला उशीर केला म्हणून संतापलेल्या नवऱ्याने पोटच्या चार वर्षाच्या मुलीला बेदम मारहाण केली. या मारहाणीत मुलीचा मृत्यू झाला आहे. बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यातील फकीरटोली गावात बुधवारी संध्याकाळी ही धक्कादायक घटना घडली. बिहारची राजधानी पाटण्यापासून ३६० किलोमीटर अंतरावर हे गाव आहे.

शंभू लाल शर्मा (४०) असे आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पूर्णिया येथील सादर हॉस्पिटलमध्ये पाठवला आहे. चौकशीमध्ये आरोपीने त्याच्या हातून घडलेल्या या अमानवीय कृत्याबद्दल खेद व्यक्त केला. आरोपी शंभू लाल गुजरातमध्ये मजूर म्हणून काम करतो. छट पूजेसाठी म्हणून तो गावी आला होता. त्याला मटण प्रचंड आवडते.

मटण बनवायला उशिर होत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्याचा पारा चढला. रागाच्या भरात त्याने त्याच्याजवळ खेळत असलेल्या चार वर्षाच्या मुलीला मारहाण सुरु केली. मुलीचा आवाज येणे बंद झाल्यानंतर त्याने मारहाण थांबवली. आपल्या कृत्यामुळे मुलगी बेशुद्ध पडल्याचे त्याच्या लक्षात आले.

त्याने लगेच मुलीला जवळच्या रुग्णालयात नेले. तिथे डॉक्टरांनी तपासल्यानंतर मुलीला मृत घोषित केले. त्याने मुलीचा मृतदेह रुग्णालयातच सोडून तिथून पळ काढला. नंतर पोलिसांनी त्याला अटक केली. आरोपी पत्नीलाही मारहाण करायचा असे स्थानिकांनी पोलिसांना सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 15, 2018 7:38 pm

Web Title: wife delay to cook mutton man kills 4 year old daughter
Next Stories
1 सिग्नेचर ब्रीज अश्लील व्हिडिओ प्रकरण: चौघांना अटक
2 मेरठचे नाव गोडसे नगर ठेवा, हिंदू महासभेची मागणी
3 बलात्काराच्या आरोपीची सुटका केल्याने आयर्लंडमध्ये आक्रोश, अंतर्वस्त्र घेऊन संसदेत पोहोचली महिला खासदार
Just Now!
X