अनैतिक संबंधात अडचण ठरणाऱ्या पतीची पत्नीने प्रियकराच्या मदतीने चाकूने भोसकून हत्या केली. गुजरातच्या अहमदाबादमध्ये मंगळवारी मध्यरात्री ही धक्कादायक घटना घडली. नवरा झोपेमध्ये असताना दोघांनी मिळून हत्या केली. वेजालपूर पोलिसांनी पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक केली असून त्यांच्याकडून हत्येसाठी वापरेलला चाकूही जप्त केला आहे.

फातेवाडीत मिल्लत-इ-इब्राहिम अपार्टमेंन्टमध्ये राहणाऱ्या झाफरुल्ला खानचा (४०) मृतदेह इमारतीच्या गच्चीवर आढळला. जफरुल्लाचा मृतदेह सर्वातआधी त्याचा भाऊ इमरान खानने पाहिला व पोलिसांना माहिती दिली. मृत जफरुल्लाची पत्नी माहेरी गेली होती. जफरुल्ला ऑटो रिक्षा चालवायचा. नुकतेच ते या इमारतीत राहायला आले होते.

जफरुल्लाची पत्नी रेहनुमाचे त्याच वस्तीत राहणाऱ्या अल्लारखा शेख बरोबर प्रेमसंबंध होते. अल्लारखा आणि रेहनुमा जफरुल्लाच्या अनुपस्थित घरी भेटायचे. ज्यावेळी जफरुल्लाने तिच्या या वागण्याला विरोध केला तेव्हा तिने घटस्फोट मागितला होता असे वेजालपूर पोलिसांनी सांगितले.

इमरानने जेव्हा जफरुल्लाचा मृतदेह पाहिला तेव्हा त्याच्या शरीरावर भोसकल्याच्या जखमा होत्या. त्यामुळे त्याला संशय आला. जेव्हा पोलिसांनी आपल्या पद्धतीने चौकशी केली तेव्हा रेहनुमा कोसळली व तिने गुन्ह्याची कबुली दिली. जफरुल्ला झोपेत असताना मध्यरात्री एकच्या सुमारास मी अल्लारखाला बोलावून घेतले.

अल्लारखा सोबत येताना चाकू घेऊन आला होता. जफरुल्ला गाढ झोपेत असताना त्याने चाकूने भोसकायला सुरुवात केली. त्यामुळे जफरुल्लाला बचावासाठी प्रतिकार करता आला नाही. हत्या केल्यानंतर अल्लारखाने रेहनुमाला त्याच्या स्कूटरवरुन तिच्या माहेरी सोडले. हत्येनंतर काही तासांच्या आत पोलिसांनी जफरुल्लाला त्याच्या घरातून अटक केली.