प्रसिद्ध सायकल कंपनी अ‍ॅटलासचे सहमालक आणि प्रवर्तक संजय कपूर यांच्या पत्नीने राहत्या घरी आत्महत्या केली. नवी दिल्लीत औरंगजेब मार्गावरील ल्युटयेन येथील घरामध्ये नताशा कपूर मंगळवारी मृतावस्थेत सापडल्या. बाथरुममधील पंख्याला लटकून त्यांनी आत्महत्या केली अशी माहिती नवी दिल्लीचे पोलीस उपायुक्त ईश सिंघल यांनी दिली.

आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी लिहिलेली चिठ्ठी सापडली आहे. या चिठ्ठीत त्यांनी नवऱ्याला आणि मुलांना आपली काळजी घ्यायला सांगितली आहे. आत्महत्येचे इतके टोकाचे पाऊल का उचलले ? ते अजून स्पष्ट झालेले नाही. कुटुंबाबरोबर आम्हाला या विषयावर बोलायचे आहे असे डीसीपीने सांगितले. पोलिसांना मंगळवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास या आत्महत्येबद्दल समजले.

case filed in Actor Aamir Khan deep fake tape case
अभिनेता आमिर खान डीपफेक चित्रफीतीप्रकरणी गुन्हा दाखल
Cops daughter commits suicide by making audiotape before suicide
मुंबई : आत्महत्येपूर्वी ध्वनीचित्रफीत तयार करून पोलिसाच्या मुलीची आत्महत्या
Rameshwar Cafe Bomb blast
Bengaluru: रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी भाजपा कार्यकर्त्याला अटक, संशयितांशी संबंध असल्याचा दावा
clemen lobo arrested after 36 years in salim cassetwala murder case
वसईतील प्रसिध्द सलीम कॅसेटवाला हत्या प्रकरण; फरार आरोपी क्लेमेन लोबोला ३६ वर्षांनी अटक

खोली आतमधून बंद होती. पोलीस घटनास्थळी पोहोचले त्यावेळी, घरातील सदस्यांनी मृतदेह खाली उतरवला होता. नताशा कपूर यांना तात्काळ गंगाराम रुग्णालयात नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी तपासल्यानंतर मृत घोषित केले. शवविच्छेदनासाठी मृतदेह नंतर राम मनोहर लोहिया रुग्णालयात हलवला. नताशा यांचा मृत्यू अनैसर्गिक असला तरी, पोलिसांनी कोणावरही संशय व्यक्त केलेला नाही.