09 March 2021

News Flash

सेक्ससाठी नकार दिला म्हणून नवऱ्याने केला पत्नीचा शिरच्छेद

महिलेने सेक्ससाठी दिलेला नकार नवऱ्याला पचवता आला नाही. त्याने संतापाच्या भरात पत्नीची भोसकून हत्या केली.

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

पतीची शरीरसुखाची मागणी पूर्ण न केल्यामुळे एका महिलेला आपले प्राण गमवावे लागले आहेत. तामिळनाडूतील त्रिचीमधील तिरुवेरंबूरमध्ये रविवारी ही घटना घडली. पत्नीने  सेक्ससाठी दिलेला नकार नवऱ्याला पचवता आला नाही. त्याने संतापाच्या भरात पत्नीची भोसकून हत्या केली. एवढयावरच त्याची क्रूरता थांबली नाही. पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर त्याने तिचा शिरच्छेद केला.

जेसिनथा जॉसबिन (२६) असे मृत महिलेचे नाव आहे. पत्नीच्या हत्येप्रकरणी तिरुवेरंबूर पोलिसांनी डी सनकर सागायाराजला अटक केली आहे. त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. यावर्षी जानेवारी महिन्यात जेसिनथा आणि सागायाराजचे लग्न झाले होते. लग्नानंतर काही महिन्यांनी त्यांच्यात वादावादीला सुरुवात झाली.

विमा कंपनीत एजंट असणारा सागायराज कामावर नियमित जात नव्हता. त्यावरुन पती-पत्नीत वारंवार खटके उडायचे. काही महिन्यांपूर्वी सागायाराजने पत्नीला काहीही न कळवता तिचे सोन्याचे दागिने गहाण टाकले होते. यावरुन त्या दोघांमध्ये भांडणे सुरु होती. नवऱ्याच्या या वागण्याला कंटाळून दोन महिन्यांपूर्वी ती तिच्या आई-वडिलांच्या घरी निघून गेली.

३० सप्टेंबरला सागायाराज आणि त्याचे आई-वडिल जेसिनथाच्या घरी गेले व तिची समजूत घालून तिला परत आणले. शनिवारी रात्री दोघांमध्ये भांडण झाल्यानंतर तिने सेक्ससाठी नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या सागायाराजने जेसिनथाची हत्या केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 8, 2018 1:33 pm

Web Title: wife refused to sex husbund kill her
Next Stories
1 #MeToo : लैंगिक गैरवर्तणुकीचा आरोप असलेल्या अभिनेता रजत कपूरचा ट्विटरवर माफीनामा
2 इंटरपोलचे माजी अध्यक्ष हाँगवेई यांनी लाच घेतली होती, चीनचा आरोप
3 राफेल कराराचा तपशील जाहीर करा, सुप्रीम कोर्टात जनहित याचिका
Just Now!
X