News Flash

पुढील वर्षात देशात १०० रेल्वे स्थानकांवर ‘वाय-फाय’ची सुविधा, ‘गुगल’च्या सुंदर पिचईंची घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'डिजिटल इंडिया' मोहिमेला पाठिंबा

गुगलचे सीईओ सुंदर पिचाई. (संग्रहित)

पुढील वर्षाच्या अखेरीस देशातील १०० रेल्वे स्थानकांवर वाय-फायची सुविधा गुगलकडून उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची घोषणा कंपनीचे सीईओ सुंदर पिचई यांनी बुधवारी केली. नवी दिल्लीत आयोजित ‘गुगल इंडिया’च्या कार्यक्रमात ते बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘डिजिटल इंडिया’ मोहिमेला पाठिंबा देत सुंदर पिचई यांनी ही घोषणा केली. याशिवाय हैदराबादमध्ये गुगलचे कॅम्पस उभारण्यात येणार असल्याचे पिचई यांनी यावळी सांगितले. या कॅम्पससाठी नव्या इंजिनिअर्सची मोठ्या प्रमाणावर भरती करण्यात येणार असल्याचेही ते पुढे म्हणाले.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरूवारी भारत दौऱयावर आलेले सुंदर पिचई यांची भेट घेणार आहेत. तसेच काही केंद्रीय मंत्र्यांचीही पिचई भेट घेतील. यासोबतच दिल्लीतील श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्सच्या विद्यार्थ्यांशी पिचई संवाद साधणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 16, 2015 2:35 pm

Web Title: wifi at 100 railway stations new hyderabad campus and more hiring announced
टॅग : Wifi
Next Stories
1 पंतप्रधान पदासाठी मीच उत्तम- आझम खान
2 दिल्ली क्रिकेटमधील गैरप्रकारांच्या चौकशीला जेटली का घाबरताहेत? – केजरीवाल
3 पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यांचा भार सामान्यांवर का? – आनंद शर्मांचा सवाल
Just Now!
X