भारताकडील अणू तंत्रज्ञानाची माहिती पाकिस्तानला देण्याची तयारी तत्कालिन पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांनी दर्शविली होती, अशी माहिती विकिलीक्सने अमेरिकी दूतावासाने पाठविलेल्या केबल्सच्या माध्यमातून दिलीये. 
इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानचे तत्कालिन पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो यांना १९७४मध्ये पत्र लिहिले होते. या पत्रामध्ये त्यांनी अणू तंत्रज्ञानाची माहिती पाकिस्तानला देण्याची तयारी दर्शविली होती. ही माहिती देण्यासाठी पाकिस्तानात विश्वासार्ह आणि पूरक वातावरण निर्माण करण्याची अटही घालण्यात आली होती. मात्र, त्यावेळी भुट्टो यांनी इंदिरा गांधी यांचा प्रस्तावा फेटाळला होता, असे अमेरिकी केबल्समध्ये म्हटले आहे.