News Flash

प्रजासत्ताक दिनी राजपथावर घडणार महाराष्ट्राच्या संत परंपरेचं दर्शन

चित्ररथाचे काम अंतिम टप्प्यात

नवी दिल्ली : प्रजासत्ताकदिनी राजपथावर महाराष्ट्राच्या संतपरंपरेचा चित्ररथ सादर होणार आहे.

प्रजासत्ताकदिनी राजधानी दिल्लीतील राजपथावर होणाऱ्या संचलन सोहळ्यामध्ये महाराष्ट्राच्या संतपरंपरेचं दर्शन घडवणारा चित्ररथ सादर होणार आहे. हा चित्ररथ तयार करण्याचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे.

दिल्लीतील महाराष्ट्र परिचय केंद्राच्या माहितीनुसार, प्रजासत्ताक दिनी येथील ऐतिहासिक राजपथावर होणाऱ्या पथ संचलनासाठी ‘महाराष्ट्राच्या संतपरंपरे’वर आधारित सुंदर व सुबक अशा चित्ररथाचे काम अंतिम टप्प्यात आहे. दिल्लीच्या कॅन्टोन्मेट परिसरातील रंगशाळेत चित्ररथाचे वैविध्यपूर्ण काम पूर्णत्वास येत असून या चित्ररथावरील प्रतिकृती आकर्षण ठरत आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव महाराज, संत गोरा कुंभार, जगद्गुरु संत तुकाराम महाराज आदी संतांसह महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सुबक प्रतिकृती चित्ररथावर असणार आहेत.

महाराष्ट्राची संतपरंपरा आणि वैचारिक वारसा या चित्ररथातून प्रतित होणार असून यानिमित्ताने महाराष्ट्राच्या समृद्धीचे दर्शन याद्वारे देशाला घडणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 20, 2021 9:20 am

Web Title: will appear of maharashtras saint tradition will be held on rajpath on republic day aau 85
टॅग : Republic Day
Next Stories
1 भाजपानं शहरांनंतर आता फळांकडे वळवला ‘नामांतर’ मोर्चा; गुजरात सरकारनं केलं ड्रॅगन फ्रूटचं बारसं
2 “ते 36 वर आउट झाले होते…आपण 44 वर…टीम इंडियाच्या विजयात लपलाय काँग्रेससाठी संदेश”
3 चीनमध्ये उइगर मुस्लिमांचा अक्षरशः नरसंहार सुरुय; ट्रम्प प्रशासनाचा निरोपापूर्वी चीनला दणका
Just Now!
X