पुणे स्थित सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला यांनी शनिवारी टि्वटरवरुन केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला एक प्रश्न विचारला आहे. सिरम इन्स्टिट्यूटने करोनावरील लशीचे उत्पादन आणि वितरणासाठी ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि अस्त्राझेनेकासोबत करार केला आहे. सध्या भारतासह जगभरात ऑक्सफर्डने विकसित केलेल्या लशीच्या तिसऱ्या फेजच्या चाचण्यास सुरु आहेत.

लाखो लोकांना ट्रेनिंग ते कमी तापमानात स्टोरेज…लस मिळाल्यानंतरही भारतासमोर असतील ‘ही’ मोठी आव्हानं

सध्याच्या घडीला लस हाच करोना व्हायरसच्या संकटातून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग आहे. कारण अजूनही देशभरात स्थिती सामान्य झालेली नाही. देशात दररोज नव्या करोना बाधितांची नोंद होत असून मृत्यूही होत आहेत. भारतात आतापर्यंत लाखो लोकांना या व्हायरसची लागण झाली आहे. हजारो लोकांना या साथीच्या आजारात आपले प्राण गमवावे लागले आहेत.

पुढच्या वर्षभरासाठी केंद्र सरकारकडे ८० हजार कोटी रुपये आहेत का? कारण लस विकत घेऊन, ती प्रत्येक भारतीयापर्यंत पोहोचवण्यासाठी इतका खर्च येणार आहे. आता आपल्याला या आव्हानाचा सामना करायचा आहे असे अदर पूनावाला यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे. आपल्या टि्वटमध्ये त्यांनी पीएमओ इंडियला टॅग केले आहे.

फक्त ऑक्सफर्ड नाही, सिरमने सुरु केलं कोडेजेनिक्स CDX-005 लशीचं उत्पादन

“मी यासाठी हा प्रश्न विचारला कारण, तशी आपल्याला योजना आखावी लागेल. आपल्या देशाची गरज लक्षात घेता, लशीची खरेदी आणि वितरणासंदर्भात देशातील व परदेशातील लस उत्पादकांना मार्गदर्शन करावे लागेल” असे अदर पूनावाला यांनी दुसऱ्या टि्वटमध्ये म्हटले आहे.

सिरम इन्स्टिट्यूट ही जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी आहे. करोनाचा फैलाव रोखणाऱ्या लशीच्या निर्मिती संदर्भात सिरमने फक्त ऑक्सफर्ड-अस्त्राझेनेकाच नाही, तर जगातील वेगवेगळया लस संशोधन करणाऱ्या संस्थांबरोबर करार केले आहेत. सध्या भारतात सिरमकडून ऑक्सफर्डने बनवलेल्या लशीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या फेजच्या चाचण्या सुरु आहेत. सिरमने अस्त्राझेनेकाप्रमाणेच अमेरिकन बायोटेक कंपनी कोडेजेनिक्स बरोबरही लस निर्मितीचा करार केला आहे. सिरमने आता कोडेजेनिक्सच्या लशीचे उत्पादन सुरु केले आहे. केडोजेनिक्सने मंगळवारी ही माहिती दिली.