News Flash

…तर सर्वांसमोर १०० उठाबशा काढेन, ममता बॅनर्जी यांचं थेट आव्हान

पोलीस दिन समारंभ कार्यक्रमात ममता बॅनर्जी बोलत होत्या

संग्रहित (फोटो : पीटीआय)

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्यात जाणुनबुजून यावर्षी दुर्गा पूजा होणार नाही अशी अफवा पसरवली जात असल्याचा आरोप केला आहे. पश्चिम बंगाल सरकारने यावर्षी दुर्गा पूजा होणार नाही असं जाहीर केल्याचं कोणी सिद्ध केलं तर मी लोकांसमोर १०० उठाबशा काढेन असं जाहीर आव्हान ममता बॅनर्जी यांनी दिलं आहे. पोलीस दिन समारंभ कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

“राजकीय पक्ष दुर्गा पूजेसंबंधी अफवा पसरवत आहे. यासंबंधी अद्याप आपण कोणतीही बैठक घेतलेली नाही. पश्चिम बंगाल सरकारने यावर्षी दुर्गा पूजा होणार नाही असं जाहीर केल्याचं सिद्ध करुन दाखवा, मी लोकांसमोर १०० उठाबशा काढेन,” असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.

“काही बनावट आयटी पेजेस दुर्गा पूजेसंबंधी चुकीची माहिती पसरवत आहेत. जाणुनबुजून अफवा पसरवणाऱ्या अशा लोकांना पकडून त्यांना कान पकडून उठाबशा काढायला लावा असं मी पोलिसांना सांगितलं आहे. जातीय सलोखा बिघडवण्यासाठीच हे सर्व केलं जात आहे. ज्यांनी कधीही दुर्गा किंवा हनुमानाची पूजा केलेली नाही ते लोक पूजेबद्दल बोलत आहेत,” अशी टीका ममता बॅनर्जी यांनी केली आहे. दरम्यान पश्चिम बंगालमध्ये करोनाच्या पार्श्वभूमीवर असलेली बंधनं २० सप्टेंबरपर्यंत कायम असणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 9, 2020 10:25 am

Web Title: will do 100 sit ups if prove we said no durga puja in 2020 says mamata banerjee sgy 87
Next Stories
1 देशातील करोनाबाधितांच्या संख्येनं ओलांडला ४३ लाखांचा टप्पा; ८९ हजारांपेक्षा अधिक रुग्णांची नोंद
2 सुशांतने मला ड्रग्स घेण्यासाठी बळजबरी केली; रियाचा खुलासा
3 …आणि दिल्ली पोलिसांनी ट्विट केला Jolly LLB मधला डायलॉग
Just Now!
X