01 March 2021

News Flash

…म्हणून कपिल सिब्बल अमित शाहांना देणार ‘दुर्बीण’ भेट

मी अमित शाहांसाठी दुर्बीण मागवली असून ती दुर्बीण मी शाहांना भेट म्हणून देणार आहे. अमित शाह राहुल गांधींना दुर्बीण लागेल, असे म्हणाले होते.

संग्रहित छायाचित्र

तीन राज्यांमधील निकालानंतर आता काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना दुर्बीण भेट म्हणून देण्याचा निर्णय घेतला आहे. अमित शाह यांनी राहुल गांधींना दुर्बीण लागेल असे म्हटले होते. पण आता अमित शाहांनाच या दुर्बिणीची गरज लागणार आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

काही दिवसांपूर्वी हैदराबाद येथील भाजपा युवा महाअधिवेशनाला संबोधित करताना अमित शाह यांनी राहुल गांधीवर निशाणा साधला होता. लोकसभा निवडणुकीनंतर राहुल गांधींना काँग्रेसला शोधण्यासाठी दुर्बीण लागेल, असे त्यांनी म्हटले होते. याच विधानाचा दाखला देत शनिवारी कपिल सिब्बल यांनी अमित शाहांवर पलटवार केला. सिब्बल म्हणाले, मी अमित शाहांसाठी दुर्बीण मागवली असून ती दुर्बीण मी शाहांना भेट म्हणून देणार आहे. अमित शाह राहुल गांधींना दुर्बीण लागेल, असे म्हणाले होते. पण तीन राज्यांमधील निकाल पाहता आता अमित शाहांनाच दुर्बीण लागेल, असे सिब्बल यांनी सांगितले.

सिब्बल यांनी राफेल प्रकरणावरही भाष्य केले. सुप्रीम कोर्टाने निकालात म्हटले आहे की केंद्र सरकारने दिलेल्या माहितीच्या आधारे निर्णय दिला. केंद्राने कोर्टात चुकीची माहिती दिली. महाधिवक्त्यांना लोकलेखा समितीसमोर हजर राहण्याचे आदेश द्यावेत आणि कोर्टात चुकीची माहिती माहिती दिल्याबद्दल त्यांच्याकडून खुलासा मागवावा. हा अत्यंत गंभीर प्रकार आहे, असे त्यांनी सांगितले.

राफेल प्रकरणावर चर्चा करण्यासाठी सुप्रीम कोर्ट योग्य जागा नाही. सुप्रीम कोर्ट पंतप्रधानांना समन्स बजावू शकत नाही आणि आम्हाला या प्रकरणात पंतप्रधानांही प्रश्न विचारायचे आहेत, असे त्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 15, 2018 2:41 pm

Web Title: will gift telescope to bjp president amit shah says congress leader kapil sibal
Next Stories
1 कर्नाटक प्रसाद विषबाधा प्रकरण, 11 मृत्यू प्रकरणी दोघे अटकेत
2 राफेल प्रकरणात केंद्र सरकारने कोर्टात चुकीची माहिती दिली: शरद पवार
3 पुलवाम्यात चकमकीनंतर सुरक्षा दलांवर दगडफेक, हिंसाचारात ६ ठार
Just Now!
X