20 October 2020

News Flash

…तर परवानगीशिवाय पाकिस्तानात कर्तारपूरला जाईन, नवज्योत सिंग सिद्धू

विलंब आणि कुठलाही प्रतिसाद न मिळणे यामुळे मला पुढचा निर्णय घेण्यामध्य अडथळा येतोय.

पाकिस्तानात होणाऱ्या कर्तारपूर कॉरिडॉर उद्घाटनाच्या कार्यक्रमाला जाण्यासंबंधी काँग्रेस नेते आणि माजी मंत्री नवज्योत सिंग सिद्धू यांनी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांना आणखी एक पत्र लिहिले आहे. पहिल्या पत्राला किमान प्रतिसाद द्या अशी अपेक्षा सिद्धूने व्यक्त केली आहे. वारंवार आठवण करुन दिल्यानंतरही परराष्ट्र मंत्रालयाकडून गुरुद्वारा साहिब कर्तारपूर कॉरिडॉरला जाण्यासाठी परवानगीसंबंधी कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही.

“विलंब आणि कुठलाही प्रतिसाद न मिळणे यामुळे मला पुढचा निर्णय घेण्यामध्य अडथळा येतोय. मी कायदा पाळणारा नागरीक आहे. तुमचा नकार असेल तर तसं सांगा मी जाणार नाही” असे सिद्धूने म्हटले आहे. “तुम्ही माझ्या तिसऱ्या पत्राला प्रतिसाद दिला नाहीत तर मी पाकिस्तानला जाण्याची तयारी सुरु करेन. लाखो शीख एलिजेबल व्हिसावर कर्तारपूरला जाणार आहेत” असे सिद्धूने म्हटले आहे.

पाकिस्तानात नऊ नोव्हेंबरला कर्तारपूर कॉरिडॉर उद्घाटनाचा कार्यक्रम होणार आहे. पाकिस्तानने या कार्यक्रमाचे नवज्योतसिंग सिद्धू यांना निमंत्रण दिले आहे. कर्तारपूर कॉरिडॉरमार्गे गुरुद्वारा दरबार साहिबला जाणाऱ्या भारताच्या अधिकृत शिष्टमंडळाचा जे भाग नाहीत त्यांना सामान्य प्रक्रियेनुसार राजकीय परवानगी घ्यावी लागेल असे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले होते.

पाकिस्तानने नवज्योतसिंग सिद्धू यांना निमंत्रण दिल्याच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली होती. भारतातून कोण यात्रेकरु जाणार आहेत त्याची यादी पाकिस्तानला देण्यात आली आहे. राजकीय क्षेत्रातून विविध व्यक्ती कर्तारपूरला जाणार आहेत. पाकिस्तानला ज्या लोकांना निमंत्रित करायचे आहे किंवा ज्यांना भविष्यात जायचे आहे अशा सर्वांना दुसऱ्या देशात जाण्यासाठी प्रक्रियेनुसार राजकीय मंजुरी घ्यावी लागेल असे परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 7, 2019 5:47 pm

Web Title: will go to kartarpur even without permission if you dont reply navjot sidhu dmp 82
Next Stories
1 हैदराबादच्या मुन्नीने रचला इतिहास, व्हर्जिनियाच्या सिनेटरपदी निवड
2 बँकिंग क्षेत्रात नोकरीची संधी; 1,163 जागांसाठी भरती
3 अयोध्याप्रकरणी लवकरच येणार निकाल; सरन्यायाधीशांनी न्या. बोबडेंकडे सोपवले महत्वाचे खटले
Just Now!
X