06 August 2020

News Flash

राजस्थानही मध्य प्रदेशच्या वाटेवर?, पायलट-गेहलोत कलह शिगेला; काँग्रेसची चिंता वाढली

मध्य प्रदेशात कमलनाथ यांना मुख्यमंत्री केल्यानंतर ज्योतिरादित्य शिंदेंनी केला होता भाजपात प्रवेश

मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यातील मतभेदांमुळे राजस्थानात एक प्रकारची राजकीय अस्थितरता निर्माण झाली आहे. (फोटो : इंडियन एक्स्प्रेस)

तीन महिन्यांपूर्वी मध्य प्रदेशची सत्ता गमावलेल्या काँग्रेससाठी आता राजस्थान चिंतेचा विषय ठरण्याची शक्यता दिसत आहे. भाजपाकडून सरकार पाडण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केला होता. त्यानंतर जयपूरमधील हालचालींनी कमालीचा वेग घेतला. याप्रकरणी भाजपाच्या दोन नेत्यांना अटक झाली. तर उपमुख्यमंत्री सचिन पायलट व मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे. त्यानंतर सचिन पायलट हे २२ आमदारांसह दिल्लीत दाखल झाले असून, नोटीस पाठवण्यात आल्यामुळे ते नाराज असल्याचं वृत्त आहे.

राजस्थानमध्ये अचानक सुरू झालेल्या राजकीय घडामोडींसंदर्भात इंडियन एक्स्प्रेसनं काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांच्या माहितीवरून विशेष वृत्त प्रसिद्ध केलं आहे. पक्षातील वरिष्ठ नेत्यांचं असं म्हणणं आहे की, अशोक गेहलोत व सचिन पायलट यांच्यात अहंकारामुळे वाद होत आहे. दोन्ही नेत्यांमध्ये एकमेकांविषयी प्रचंड अविश्वास आहे. काँग्रेसच्या एका माजी केंद्रीय मंत्र्यांनं सांगितलं की, सध्याच्या परिस्थितीत कोणत्याही गोष्टीचा भरवसा दिला जाऊ शकत नाही. त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यानींही सध्याचा वाद काँग्रेसमधील मोठ्या समस्येचा भाग आहे. ज्यात पक्षातील युवा नेतृत्त्वाला आपल्या भविष्याविषयी चिंता सतावू लागली आहे. तर दुसरीकडे पक्ष राष्ट्रीय नेतृत्त्वाचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहे.

काँग्रेस पक्ष २०१८मध्ये राजस्थानात सत्तेत आल्यानंतरच अशोक गेहलोत व सचिन पायलट यांच्यात वादाची थिणगी पडली होती. काँग्रेसनं विधानसभा निवडणुकीसाठी निवडलेल्या नेतृत्त्वापासून याची सुरूवात झाली होती. त्यानंतर जेव्हा काँग्रेसनं तिसऱ्यांदा अशोक गेहलोत यांना मुख्यमंत्री केलं, त्यानंतर वादाची ही दरी आणखी वाढली. या मागील महत्त्वाचं कारण म्हणजे २०१३मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत मानहाणीकारक पराभव झाल्यानंतर राजस्थानमधील काँग्रेस प्रदेशाध्यपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर सचिन पायलट यांनी पक्ष बांधणीचं मोठं काम केलं होतं. त्यानंतर खातेवाटपावरूनही दोन्ही नेत्यांमधील नाराजी स्पष्टपणे दिसून आली होती.

अशोक गेहलोत यांनी आपला मुलगा वैभव याला जोधपूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. त्यावरून दोन्ही नेत्यांमध्ये धुसपूस झाल्याचं दिसून आलं होतं. लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर सचिन पायलट यांच्या गटानं गेहलोत यांच्यावर मुलाच्या मतदारसंघात पूर्ण लक्ष दिल्याचाही आरोप केला होता. त्यानंतर महापौर उमेदवारांची निवड कोटातील रुग्णालयात झालेल्या बालकांच्या मृत्यू प्रकरणावरून सचिन पायलट व अशोक गेहलोत यांच्यातील वाद चव्हाट्यावर आले होते. बालकांच्या मृत्यूप्रकरणी गेहलोत यांनी आधीच्या सरकारवर आरोप केला होता, तर पायलट यांनी काँग्रेसलाच दोषी ठरवलं होतं. त्यामुळे गेहलोत आणि पायलट यांच्यातील वाद सातत्यानं सुरू होते. घोडेबाजाराच्या आरोपानंतर आलेल्या नोटीसीनं त्यात आणखी भर टाकली आहे. मध्य प्रदेशातही कमलनाथ यांना मुख्यमंत्री केल्यानंतर ज्योतिरादित्य शिंदे यांनी भाजपात प्रवेश केला होता. त्यामुळे राजस्थानातही मध्य प्रदेशची पुनरावृत्ती होत की काय? याकडे दिल्लीतील राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. तर काँग्रेसच्या चिंतेत भर पडली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 12, 2020 3:17 pm

Web Title: will jaipur go bhopal way congress leadership alarmed bmh 90
Next Stories
1 UN च्या परवानगीने हाफिज सईदसह लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्यांची बँक खाती पुन्हा सुरु
2 जगाने बघितलं, भारताने करोना विरोधात यशस्वी लढाई लढली – अमित शाह
3 अ‍ॅपल चीनमधून उत्पादन बंद करणार? फॉक्सकॉनची भारतात १ अब्ज डॉलर्सची गुंतवणूकीची योजना
Just Now!
X