News Flash

‘मला दिसणाऱ्या सर्व मुलींना ठार करणार’, प्रेयसी नसल्याने संतापलेल्या तरुणाची पोस्ट

त्याने फेसबुकवर केली होती पोस्ट

ख्रिस्तोफर क्लॅरी

अमेरिकेतील उथा येथे एका व्यक्तीला पोलिसांनी एका फेसबुक पोस्टमुळे अटक केली आहे. या फेसबुक पोस्टमध्ये संबंधित व्यक्तीने ‘मला दिसणाऱ्या सर्व मुलींना मी ठार करणार आहे’ असं लिहीलं होतं. विशेष म्हणजे या विकेण्डला अमेरिकेतील अनेक शहरांमध्ये महिलांच्या हक्कांसाठी महिला मोर्चांचे आयोजन केले असतानाच या व्यक्तीने अशी पोस्ट केल्याने एकच खळबळ उडाली. लगेचच पोलिसांनी कारवाई करत या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली.

प्रोव्हो शहरामधील पोलीस खात्याने दिलेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव ख्रिस्तोफर क्लॅरी असं असून तो २७ वर्षांचा आहे. या तरुणाने रागाच्या भरात ही पोस्ट केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. २७ वर्षांच्या तरुणाला प्रेयसी नसल्याने तो स्वत:वरच रागवलेला आणि याचाच राग काढण्यासाठी अनेक तरुणांनी ठार करण्याचा त्याचा विचार होता असं पोलिसांनी म्हटले आहे.

क्लॅरी हा मूळचा डेव्हेर शहरातील आहे. याप्रकरणी कोलेरॅडो पोलिसांनी प्रोव्हो पोलिसांना संपर्क साधला आहे. दोन्ही पोलीस खात्यांनी क्लॅरीच्या नावावर याआधी काही गुन्ह्यांची नोंद आहे का याचा तपास पोलीस करत आहे. पोलिसांनी त्याला दहशतवाद परसरवण्याची धमकी देण्याच्या गुन्ह्याखाली अटक केली आहे. एकीकडे देशभरामध्ये महिला मोर्चांचे आयोजन होत असताना त्याच दिवशी ही पोस्ट केल्याने पोलिसांनी तातडीने या व्यक्तीच्या घरी छापा टाकून त्याला ताब्यात घेतले. त्या व्यक्तीने आपण या मोर्चांबद्दल बोलत असल्याचे पोस्टमध्ये नमूद केले नव्हते तरी पोलिसांनी महिलांची सुरक्षा लक्षात घेऊन या व्यक्तीला अटक केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2019 4:08 pm

Web Title: will kill all girls i see man threatens on facebook because he never had a girlfriend
Next Stories
1 १२ वर्षीय पुणेकराने तयार केले समुद्र स्वच्छ करणाऱ्या जहाजाचे डिझाइन
2 प्रियंकाच्या एंट्रीने भाजपा घाबरली: राहुल गांधी
3 SC-ST उमेदवारांना न्यायाधीश बनण्याचे निकष सोपे व्हावेत : सरन्यायाधीश
Just Now!
X