२०२२ पर्यंत नवा भारत घडवणे हे आपले स्वप्न आहे. यासाठी देशातून गरीबी, अस्वच्छता, भ्रष्टाचार, दहशतवाद, जातीयवाद आणि जातीय दंग्यांना हद्दपार करणार असे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ट्वीटरद्वारे सांगितले. स्वातंत्र्य चळवळीतील महत्वाचा भाग असणाऱ्या ‘चले जाव’ चळवळीला आज ७५ वर्षे पूर्ण झाली.

पंतप्रधान मोदी म्हणाले, १९४२ मध्ये वसाहतवादापासून मुक्ततेला देशात सुरुवात झाली. या घटनेला आज ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यावेळे प्रश्न वेगळे होते, आजचे प्रश्न बदलले आहेत. त्यामुळे आज आपण गरीबी, अस्वच्छता, भ्रष्टाचार, दहशतवाद, जातीयवाद आणि जातीय दंग्यांना देशातून मुक्ततेसाठी शपथ घेऊयात. यानंतर त्यांनी लोकसभेत आयोजित विशेष सत्रात चले जाव चळवळीबाबत आपले मतप्रदर्शन केले. आपल्यासाठी हा अभिमानाचा दिवस असल्याचे ते यावेळी म्हणाले.