05 December 2020

News Flash

पाकिस्तानमधील हिंदू मंदिरांना धक्का लागू देणार नाही- हाफीज सईद

सईदने काश्मीरी मुसलमानांचे पाठिंबा दिल्ल्याबद्दल आभारही मानले आहेत.

| May 3, 2016 02:23 pm

दहशतवादी हाफिज सईद. (संग्रहित छायाचित्र)

आमची संघटना पाकिस्तानमधील हिंदू मंदिरांना आणि बिगर मुस्लिमांच्या पवित्र धार्मिक स्थळांना धक्का लागू देणार नाही, अशी ग्वाही जमात-उल-दवा संघटनेचा प्रमुख हाफीज सईद याने दिली आहे. हाफीज सईद हा मुंबईवरील २६\११ हल्ल्याच्या प्रमुख सुत्रधारांपैकी एक आहे. तो काल सिंध प्रांतातील माटली येथे एका बैठकीदरम्यान बोलत होता. पाकिस्तानमधील मंदिरे आणि अन्य धर्मीयांची धार्मिक स्थळे नष्ट करण्याला आम्ही पाठिंबा देणार नाही. जमात-उल-दवा या संघटनेवर भारताच्या सीमेलगत असणाऱ्या सिंध प्रांतात मदरसे स्थापन करून कट्टरतावाद पसरविण्याचा आरोप आहे. मात्र, हे सर्व आरोप संघटनेने फेटाळून लावले आहेत. याशिवाय, सईदने काश्मीरी मुसलमानांचे पाठिंबा दिल्ल्याबद्दल आभारही मानले आहेत. पाकिस्तानातील कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्था प्रामाणिकपणे पाकविरोधी घटक आणि ‘रॉ’सारख्या संघटनांविरोधात लढा देत आहेत. मात्र, नवाज शरीफ सरकार याबाबत सातत्याने मौन बाळगून असल्याचा आरोपही हाफीजने या बैठकीदरम्यान केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 3, 2016 2:23 pm

Web Title: will not allow hindu temples in pakistan to be destroyed hafiz saeed
Next Stories
1 अजमेर शरीफ दर्ग्याचे पीर काजमींनी घेतली मोदींची भेट
2 भर रस्त्यात तरुणीचे अपहरण करून बलात्काराचा प्रयत्न!
3 उत्तराखंडमध्ये शक्तिपरीक्षा घेण्यावर सुप्रीम कोर्टाने केंद्राचे मत मागवले
Just Now!
X