वादग्रस्त वक्तव्यांमुळे अलीकडे अनेकदा टीकेचे धनी ठरलेले संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी पुढील सहा महिने माध्यमांशी संभाषण न करण्याचा निर्णय घेतला आहे.

एका पत्रकाराने संरक्षणविषयक प्रश्न विचारला असता पर्रिकर यांनी, आपण सहा महिने माध्यमांशी भाष्य न करण्याचे ठरविले आहे, असे सांगितले. एका हॉस्पिटलच्या पायाभरणी कार्यक्रमासाठी पर्रिकर येथे आले होते. भारतीय लष्कराचे महत्त्व कमी झाले आहे, चीनमधील गणपतीच्या मूर्तीचे डोळे छोटे आहेत, ही पर्रिकर यांची विधाने अलीकडे वादग्रस्त ठरली होती. त्यामुळे संरक्षण मंत्रालयाबाबतच्या प्रश्नांना उत्तरे देण्यास त्यांनी नकार दिला.