तामिळनाडू विधानसभेच्या निवडणुकीत आपण कोणत्याही पक्षाला पाठिंबा देणार नसल्याचे द्रमुकतून हकालपट्टी करण्यात आलेले नेते एम. के. अळगिरी यांनी स्पष्ट केले आहे.
निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार असे विचारले असता, आपण कोणालाही पाठिंबा देणार नाही, इतकेच वक्तव्य अळगिरी यांनी केले. लोकसभेच्या निवडणुकीत एमडीएमकेचे नेते वायको, भाजपचे एच. राजा यांनी अळगिरी यांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले होते.
अळगिरी यांनी अलीकडेच आपले वडील आणि द्रमुकचे नेते करुणानिधी यांची भेट घेतली होती, त्यामुळे ते स्वगृही परतणार अशी अटकळ बांधली जात होती, मात्र स्टालिन यांनी ती शक्यता फेटाळली होती.