26 January 2021

News Flash

‘केंद्राने नाही दिली, तर आम्ही दिल्लीच्या जनतेला मोफत करोना लस उपलब्ध करुन देऊ’

अरविंद केजरीवालांची महत्वाची भूमिका

“केंद्र सरकारने करोना प्रतिबंधक लसीचा मोफत पुरवठा केला नाही, तर आम्ही दिल्लीकरांना मोफत लस  उपलब्ध करुन देऊ” असे दिल्लीचे मुख्यमंत्रीअरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे.

“सर्व देशवासियांना ही लस मोफत उपलब्ध करुन देण्याचे मी केंद्र सरकारला आवाहन केले आहे. कारण आयुष्य वाचवणारी ही लस विकत घेणे, अनेकांना परवडणारे नाही” असे अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे. पीटीआयने हे वृत्त दिले आहे.

“केंद्र काय करते, ते आम्ही पाहू. केंद्राने मोफत लस उपलब्ध करुन दिली नाही, तर आम्ही दिल्लीच्या जनतेला ती लस मोफत उपलब्ध करुन देऊ” असे अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे.

लसीबद्दल अफवा न पसरवण्याचे सुद्धा त्यांनी जनतेला आवाहन केले. “सुरक्षितता आणि सर्व आवश्यक काळजी घेऊन, केंद्र आणि आपल्या शास्त्रज्ञांनी या लसीला मान्यता दिलीय. त्यामुळे कुठलाही संशय न बाळगता लोकांनी लसीकरणासाठी पुढे आले पाहिजे” असे केजरीवाल म्हणाले.

“आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी आणि करोना योद्ध्यांना सर्वप्रथम या लसीचा डोस दिला जाईल. मागच्या वर्षभरापासून लोक त्रास सहन करतायत. लसीमुळे त्यांना दिलासा मिळेल” अशी अपेक्षा केजरीवाल यांनी व्यक्त केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 13, 2021 5:26 pm

Web Title: will provide covid vaccine free to people of delhi if centre fails to do so says cm arvind kejriwal dmp 82
Next Stories
1 ‘सीरम’पाठोपाठ ‘भारत बायोटेक’ची लसही रवाना; ११ शहरांमध्ये होणार वितरण
2 भारत-पाकिस्तान सीमेवर आढळला १५० मीटर लांब बोगदा; बीएसएफने घुसखोरीचा डाव उधळला
3 भय इथले संपत नाही… लस घेतल्यानंतरही झाला करोनाचा संसर्ग; डॉक्टरही संभ्रमात
Just Now!
X