X
X

समजून घ्या.. सहजपणे, उन्हाळयात करोनाचा विषाणू मरणार का?

READ IN APP

उष्ण वातावरणात करोना व्हायरसचा विषाणू जगणार नाही, असे म्हटले जाते. पण खरोखरच हे शक्य आहे का?

भारतात सध्या उकाडा वाढत असून काही भागांमध्ये तापमान ३० अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. पुढच्या दोन आठवडयात उत्तर भारतात तापमान ४० अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. या उष्ण वातावरणात करोना व्हायरसचा विषाणू जगणार नाही, असे म्हटले जाते. पण खरोखरच हे शक्य आहे का?. तापमान आणि वातावरणातील दमटपणाचा करोना विषाणूवर नेमका काय परिणाम होतो, यावर जगभरात मोठया प्रमाणावर संशोधन सुरु आहे.
यावर तज्ञांची काय मत आहेत, ते आपण जाणून घेऊया…

जागतिक आरोग्य संघटना
“सर्व भागांमध्ये उष्ण आणि दमट वातावरणात करोना व्हायरसचा विषाणू माणसामध्ये संक्रमित होऊ शकतो. तसे पुरावे उपलब्ध आहेत” असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.

भारतातील ICMR
तापमान आणि करोना विषाणूचा फैलाव यांचा परस्पराशी काहीही संबंध नाही असे इंडियन काउन्सिल ऑफ मेडीकल रिसर्चचे संचालक बलराम भार्गव यांनी म्हटले आहे.

AIIMS संचालक
COVID-19 विरोधात रणनिती बनवण्यासाठी उच्चस्तरीय समितीचे सदस्य असलेले एम्सचे संचालक रणदीप गुलेरीया यांनी अलीकडेच इंडियन एक्स्प्रेसला मुलाखत दिली. त्यामध्ये त्यांनी सांगितले की, “बाहेरच्या वातावरणात तापमान जर ४० अंश सेल्सिअसच्या पुढे असेल तर करोना विषाणू जिवंत राहण्याची शक्यता कमी आहे. पण आपण दोन गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत, उष्णकटिबंधीय क्षेत्रामध्ये करोना विषाणूचा मोठया प्रमाणावर फैलाव झाला आहे. आपण जास्तवेळ घरामध्ये घालवत आहोत, तिथे एसी सुरु असतो. त्यामुळे उन्हाळयात बाहेर संक्रमण रोखता येईल पण घराच्या आतमध्ये एसी सुरु असल्यास संक्रमण रोखणे कठिण जाईल”

रिसर्चमधून काय समोर आले ?
उष्णता, दमटपणा जिथे कमी आहे. तापमान पाच अंश ते ११ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. तिथे करोना विषाणूचे माणसांमध्ये मोठया प्रमाणावर संक्रमण  होत आहे. प्राध्यापक मोहम्मद साजादी यांच्या अभ्यासातून हे समोर आले आहे. ते मेरीलँड विद्यापीठात व्हायरलॉजी विभागात प्राध्यापक आहेत.

करोना हा ऋतुमानानुसार फैलावणारा विषाणू असल्याचा आमचा अंदाज आहे असे साजादी यांनी ‘द टेलिग्राफ’शी बोलताना सांगितले.

बिजींगच्या एका विद्यापीठातील शास्त्रज्ञांचाही अशाच पद्धतीचा निष्कर्ष आहे. “उष्ण वातावरण आणि दमटपणामध्ये Covid-19 चे संक्रमण तुलनेने कमी होते. तापमानात एक अंश सेल्सिअसचा जरी फरक पडला तर या व्हायरसवर मोठा परिणाम दिसून येतो” असा या शास्त्रज्ञांचा निष्कर्ष आहे. ‘द टेलिग्राफ’ने शास्त्रज्ञाच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे.

 

21
X