News Flash

पावसाळ्यात करोनाच्या प्रादुर्भावाचा वेग वाढणार का?; एम्सचे संचालक म्हणाले…

पावसाळ्यात करोनाचा फैलाव वाढेल अशी चर्चा सध्या सर्वत्र सुरु

संग्रहित छायाचित्र

देशभरात आता पावसाळा सुरु झाला आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या तीन महिन्यांपासून देशात थैमान घातलेल्या करोना विषाणूचा फैलाव पावसाळ्यात अधिक वेगाने होईल अशा चर्चा सर्वत्र सुरु आहेत. यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयाचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी भाष्य केलं आहे. पावसाच्या काळात करोनाच्या फैलावात कोणताही मोठा बदल दिसून येणार नाही असं त्यांनी म्हटलं आहे.

विविध माध्यमांमधील काही वृत्तांमधून असा दावा करण्यात आला आहे की, पावसाळ्यात हवेत आर्द्रता असल्याने करोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणावर होईल. यावर डॉ. गुलेरिया म्हणाले, “पावसाळ्यातही करोनाच्या संक्रमाणाच्या वेगामध्ये विशेष बदल होणार नाही. त्यामुळे करोनाच्या संकाटामुळे घाबरलेल्या लोकांसाठी ही दिलासादायक बाब ठरू शकते.” यापूर्वी आयआयटी मुंबईच्या दोन प्राध्यापकांनी एका अभ्यासातून दावा केला होता की, उष्ण आणि शुष्क वातावरणात करोनाचा वेग कमी होतो तर आर्द्रतेच्या वातावरणात संक्रमणाचा वेग वाढतो. इंडिया टुडेने याबाबत वृत्त दिले आहे.

डॉ. गुलेरिया म्हणाले, “मला वाटत नाही की पावसाळा आल्यानंतर करोनाच्या संक्रमणामध्ये कुठलाही नाट्यमयरित्या बदल दिसून येईल. कारण उन्हाळ्यात लोक म्हणत होते की संक्रमण थांबेल पण असं झालं नाही. पण पावसाळ्यात डॉक्टरांना उपचारपद्धती बदलाव्या लागतील. कारण आता डेंग्यू, चिकनगुनियाचे रुग्ण वाढू लागतील. ज्याचे लक्षणं करोनासारखेच असतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 28, 2020 6:11 pm

Web Title: will the outbreak of corona increase in the rainy season the director of aiims said no aau 85
टॅग : Coronavirus
Next Stories
1 लग्नासाठी बोलावलेल्या पाहुण्यांपैकी १५ जण निघाले करोना पॉझिटिव्ह; एकाचा मृत्यू
2 भारतातील भांडी निर्मिती क्षेत्रातील सर्वात मोठ्या कंपनीचा चीनला दणका; आयात बंदीचा निर्णय
3 १९६२ पासूनची चर्चा करु हिंमत असेल तर संसदेत या, राहुल गांधींना अमित शाह यांचं आव्हान
Just Now!
X