अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पहिल्याच वादविवाद चर्चेत विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले. यावेळी ट्रम्प यांनी जगभरात करोना व्हायरसमुळे होत असलेल्या मृत्यूवंर मोठं विधान केलं. अमेरिकेची परिस्थिती इतर देशांपेक्षा चांगली आहे हे सांगण्यासाठी ट्रम्प यांनी थेट चीन, रशिया आणि भारतावर निशाणा साधला. या तिन्ही देशांमधील करोना मृत्यूचे आकडे हे खोटे असल्याचा दावा ट्रम्प यांनी केला. यावरुनच आता काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. ट्रम्प यांच्यासाठी मोदी आणखी एक ‘नमस्ते ट्रम्प’ कार्यक्रम आयोजित करणार का असा खोचक सवाल चिदंबरम यांनी विचारला आहे.

“डोनाल्ड ट्रम्प यांनी चीन, रशिया यांच्यासोबत भारताने कोविड मृत्यूची संख्या लपवून ठेवल्याचा आरोप केला आहे. सर्वात जास्त वायू प्रदूषण कारणीभूत असल्याचा आरोपही त्यांनी या तीन देशांवर केला. अशात आपल्या प्रिय मित्राचा सन्मान करण्यासाठी मोदी आणखी एक ‘नमस्ते ट्रम्प’ रॅली घेतील का?” असे चिंदबरम यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.


अमेरिकेत बुधवारी निवडणुकीपूर्वी पहिली ‘प्रेसिडेन्शिअल डिबेट’ पार पडली. यादरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार जो बायडेन यांच्यात एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले गेले. यावेळी ट्रम्प यांनी जगभरात करोना व्हायरसमुळे होत असलेल्या मृत्यूवंर मोठं विधान केलं. चीन, रशिया आणि भारत करोनामुळे होत असलेल्या मृत्यूचे आकडे खोटं सांगत असे ट्रम्प म्हणाले. कॉंग्रेसचे नेते पी. चिदंबरम यांनी यावरून पंतप्रधान मोंदीवर टीका करत डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी आणखी एक “नमस्ते ट्रम्प” रॅली घेणार का असा सवाल केला आहे.

तुम्ही ४७ वर्षांत जे केले त्यापेक्षा जास्त काम ४७ महिन्यांत मी केले आहे असंही ट्रम्प म्हणाले होते. जर यातून तुम्हाला एखाद्या भारतीयाची आठवण येत असेल तर ती तुमची फक्त कल्पना आहे, असंही ट्रम्प म्हटलं आहे. कोविड १९ साथीची हाताळणी, प्राप्तिकराचा प्रश्न या मुद्दय़ांवर दोन्ही नेत्यांत खडाजंगी झाली. ओहिओतील क्लिव्हलँड येथे वादविवाद चांगलाच रंगला. ट्रम्प यांना सर्वोच्च न्यायालयात अ‍ॅमी कॉनी बॅरेट यांची नेमणूक केल्याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी सांगितले की, आम्ही निवडणूक जिंकली आहे, मी अध्यक्ष असल्याने मला न्यायाधीश नेमणुकीचा अधिकार आहे