येथे एका कृष्णवर्णीय व्यक्तीवर पोलीस अधिकाऱ्यांनी पाठीमागून सात वेळा गोळ्या मारल्याची चित्रफीत समाजमाध्यमावर प्रसारित झाल्यानंतर लोकांनी रस्त्यावर उतरून या अत्याचाराच्या विरोधात निदर्शने सुरू केली आहेत. या घटनेवर गव्हर्नरांनी पोलिसांवर ताशेरे ओढले आहेत.

या कृष्णवर्णीय व्यक्तीला गोळीबारात जखमी झाल्यानंतर रविवारी सायंकाळी पाच वाजता रुग्णालयात दाखल करण्यात आले, अशी माहिती केनोशा पोलिसांनी दिली आहे. एका घरगुती भांडणाच्या तक्रारीला प्रतिसाद म्हणून पोलीस घटनास्थळी गेले असता हा प्रकार झाला. पोलिसांनी गोळीबार कशासाठी केला हे स्पष्ट केले नाही पण या कृष्णवर्णीय व्यक्तीला उपचारासाठी मिलवाउकी येथे रुग्णालयात दाखल केले आहे. रविवारी ही घटना उघडकीस येताच लोक रस्त्यावर आले व त्यांनी जाळपोळ केली.