03 August 2020

News Flash

मोदींना ‘फादर ऑफ कंट्री’ म्हणत मिसेस सीएमकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा

अमृता फडणवीस यांना अनेक नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे. मिसेस सीएम अर्थात अमृता फडणवीस यांनीही एक ट्विट करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा दिल्या आहेत. या ट्विटमध्ये त्यांनी नरेंद्र मोदींचा उल्लेख ‘फादर ऑफ कंट्री’ असा केला आहे. तसेच त्यांनी त्यांच्या आवाजात गायलेल्या ‘गुंजासा है इकतारा’ या गाण्याचा एक मुखडाही पोस्ट केला आहे.

समाजाच्या भल्यासाठी सातत्याने प्रेरणा देणारे फादर ऑफ कंट्री नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा या आशयाचं ट्विट अमृता फडणवीस यांनी केलं आहे. राष्ट्रपिता अर्थात फादर ऑफ नेशन असं महात्मा गांधी यांना संबोधलं जातं. आता अमृता फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना फादर ऑफ कंट्री असं म्हणत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

अमृता फडणवीस यांनी शुभेच्छांचा ट्विट केल्यानंतर आणि त्यामध्ये नरेंद्र मोदींचा उल्लेख फादर ऑफ कंट्री असा केल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केलं आहे. ‘संबित पात्रा आणि तुम्ही एकाच व्हॉट्स अॅप ग्रुपमध्ये आहात का?’ असा प्रश्न एकाने विचारला आहे. ‘तुम्ही वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहात की प्रमोशन करत आहात?’ असेही एकाने विचारलं आहे. तर राष्ट्रपिता हे महात्मा गांधी यांना म्हणतात हे तुम्हाला ठाऊक नाही का? असं एका नेटकऱ्याने विचारलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 17, 2019 5:50 pm

Web Title: wishing the father of our country narendramodi a very happy birthday says amruta fadanvis in her tweet scj 81
Next Stories
1 आज समजणार चंद्रावर विक्रम लँडरसोबत नेमकं काय घडलं
2 VIDEO: ‘…आणि मला काच खाण्याचे व्यसन लागले’; ४० वर्षांपासून काच खाणाऱ्याची गोष्ट
3 पी व्ही सिंधूसोबत लग्न करण्यासाठी ७० वर्षाच्या आजोबांची याचिका
Just Now!
X