रिझर्व्ह बँकेचा ट्विटरवर चांगलाच बोलबाला आहे. कारण बँकेच्या अॅपने ट्विटरवर १ मिलियन फॉलोअर्सचा टप्पा गाठला पूर्ण केला आहे. जो जगातील कुठल्याही मध्यवर्ती बँकेपेक्षा जास्त आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी रविवारी आपल्या ट्विटवरवरुन याची माहिती दिली.

शक्तिकांत दास म्हणाले, “आरबीआयच्या ट्विटर अकाउंटने आज १ मिलियन फोलॉअर्सचा टप्पा पार केला. आरबीआयमधील आमच्या सर्व सहकाऱ्यांचे अभिनंदन.” रिझर्व्ह बँक ही एक अशी बँक आहे ज्या बँकेची धुरा जगातील अनेक चांगल्या तज्ज्ञ आणि आघाडीच्या लोकांनी सांभाळली आहे. ८५ वर्षे जुनी असलेल्या या बँकेने कायमच भारताला आणि जगाला आर्थिक उन्नतीचा मार्ग दाखवला आहे.

३० एप्रिल २०२० पासून रिझर्व्ह बँकेच्या फॉलोअर्समध्ये अडीच लाख फॉलोअर्सची भर पडल्याने ट्विटवर ७,५०,००० फॉलोअर्सच्या संख्येने मैलाचा दगड गाठला. २० एप्रिल रोजी आरबीआयच्या फॉलोअर्समध्ये १,३१,००० फॉलोअर्सची भर पडली. मार्च २०१९ पासून ट्विटरच्या फॉलोअर्सच्या संख्येत दुप्पट वाढ झाली. ही संख्या ३,४२,००० हून ७,५०,००० वर पोहोचली.

आरबीआयची दोन ट्विटर अकाउंट आहेत. सुरुवातीच्या ट्विटर अकाउंटद्वारे बँकेच्या महत्वाच्या धोरणांबाबत माहिती दिली जात आहे. तर नव्या ट्विटर अकाउंटव्दारे लोकांमध्ये बँकिंग व्यवहारांबाबत जनजागृती करण्यात येते.

आरबीआयनंतर इंडोनेशियाची मध्यवर्ती बँकेचा क्रमांक लागतो. या बँकेच्या ट्विटर अकाउंटचे ७,५७,५०० फॉलोअर्स आहेत. तर मेक्सिकोची मध्यवर्ती बँक बँन्को दि मेक्सिको तिसऱ्या क्रमांकावर असून त्याच्या ट्विटर हँडलचे ७,७४,२०० फॉलोअर्स आहेत.

आरबीआयने ट्विटरवर आपलं अकाउंट जानेवारी २०१२मध्ये तयार करण्यात आलं आहे.