देशभरात मागील २४ तासांमध्ये २२ हजार ६५ नवे करोनाबाधित आढळले असून, ३५४ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. तर, ३४ हजार ४७७ जण करोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी मिळाली आहे. याचबरोबर देशातील एकूण करोनाबाधितांच्या संख्येने आता ९९ लाखांचा टप्पा ओलांडला आहे.
देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या आता ९९ लाख ६ हजार १६५ वर पोहचली आहे. सद्यस्थितीस देशात ३ लाख ३९ हजार ८२० अॅक्टिव्ह केसेस असून, ९४ लाख २२ हजार ६३६ जणांनी करोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालेला आहे. याशिवाय, आतापर्यंत देशात १ लाख ४३ हजार ७०९ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाल्याचीही नोंद झालेली आहे.
With 22,065 new #COVID19 infections, India’s total cases rise to 99,06,165
With 354 new deaths, toll mounts to 1,43,709. Total active cases at 3,39,820
Total discharged cases at 94,22,636 with 34,477 new discharges in the last 24 hours. pic.twitter.com/NzAo6yFeWT
— ANI (@ANI) December 15, 2020
करोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात १४ डिसेंबरपर्यंत १५, ५५, ६०, ६५५ नमुन्यांची तपासणी झाली आहे. यापैकी ९ लाख ९३ हजार ६६५ नमूने काल तपासण्यात आले असल्याची माहिती आयसीएमआरच्या हवाल्याने एएनआयने दिली आहे.
A total of 15,55,60,655 samples tested for #COVID19 up to 14th December. Of these, 9,93,665 samples were tested yesterday: Indian Council of Medical Research (ICMR) pic.twitter.com/kPq0tOONkE
— ANI (@ANI) December 15, 2020
दरम्यान, राज्यात करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी संशयितांच्या जास्तीत जास्त चाचण्या व्हाव्यात यासाठी खासगी प्रयोगशाळेत होणाऱ्या करोना चाचणीचे दर आणखी २०० रुपयांनी कमी करण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. त्यानुसार आता केवळ ७८० रुपयांमध्ये कोणत्याही खासगी प्रयोगशाळेत जाऊन करोनाची चाचणी करता येईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेली आहे.
तर, केंद्र सरकारने करोना लसीकरण मोहिमेसाठी राज्यांना मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. प्रत्येक दिवशी एका सत्रात १०० ते २०० लोकांचे लसीकरण, लस दिल्यानंतर प्रतिकूल परिणाम पाहण्यासाठी ३० मिनिटे देखरेख आणि एका वेळी एकाच व्यक्तीला लस, अशा प्रमुख मार्गदर्शक सूचनांचा त्यांत समावेश आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 15, 2020 10:11 am