देशभरात ३५४ नवे करोनाग्रस्त सापडल्याने देशातल्या करोनाग्रस्तांची संख्या ४ हजार ४२१ इतकी झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबतची माहिती दिली आहे. लॉकडाउन १४ एप्रिलपर्यंत पुकारण्यात आला आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउनचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र दिवसेंदिवस देशात करोना रुग्णांची संख्या वाढताना दिसते आहे. ही नक्कीच चिंतेची बाब आहे.

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात २५ मार्च ते १४ एप्रिल असा २१ दिवसांचा लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. मात्र खबरदारीचे उपाय योजूनही करोनाग्रस्तांची संख्या वाढते आहे. आत्तापर्यंत ११७ जणांचा करोनामुळे मृत्यू झाले आहेत. दरम्यान महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये करोनाग्रस्तांची संख्या वाढते आहे. त्यामुळे लॉकडाउन वाढवण्याचा प्रस्ताव राज्य सरकारांकडून केंद्राला देण्यात आला आहे. आता यावर विचारविनीमय सुरु आहे. लॉकडाउन वाढणार की आणखी काही निर्णय घेतला जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.