30 November 2020

News Flash

देशभरात २४ तासांत ५० हजार १२९ नवे करोनाबाधित, ५७८ रुग्णांचा मृत्यू

देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या आता ७८ लाख ६४ हजार ८११ वर

प्रतिकात्मक छायाचित्र

देशातील करोना संसर्गाचा वेग काहीसा मंदावल्याचे दिसत असले, तरी देखील नवीन करोनाबाधित अद्यापही मोठ्या संख्येने आढळत आहेत. शिवाय, करोनामुळे मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येतही भर पडतच आहे. मागील २४ तासांमध्ये देशभरात ५० हजार १२९ नवे करोनाबाधित आढळले असून, ५७८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याचबरोबर देशातील एकूण करोनाबाधितांची संख्या आता ७८ लाख ६४ हजार ८११ वर पोहचली आहे.

देशभरातील एकूण ७८ लाख ६४ हजार ८११ करोनाबाधितांच्या संख्येत ६ लाख ६८ हजार १५४ अॅक्टिव्ह केसेस, डिस्चार्ज मिळालेले ७० लाख ७८ हजार १२३ जण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या १ लाख १८ हजार ५३४ जणांच्या संख्येचा समावेश आहे.

२४ ऑक्टोबर पर्यंत देशात १०,२५,२३,४६९ नमूने तपासण्यात आले आहेत. तर, यातील ११ लाख ४० हजार ९०५ नमून्यांची काल तपासणी झाली आहे. आयसीएमआरच्या हवाल्याने हे वृत्त देण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 25, 2020 11:02 am

Web Title: with 50129 new covid19 infections indias total cases surge to 7864811 msr 87
टॅग Coronavirus
Next Stories
1 भारताला चीनपेक्षा आधिक शक्तीशाली व्हावं लागेल – मोहन भागवत
2 विजयादशमीच्या मुहूर्तावर आज पंतप्रधान मोदी ‘मन की बात’द्वारे साधणार जनतेशी संवाद
3 Free COVID Vaccine : ‘लस’कारण
Just Now!
X