03 December 2020

News Flash

Coronavirus : देशभरात २४ तासांत ५३ हजार ३७० नवे रुग्ण, ६५० जणांचा मृत्यू

देशातील एकूण करोनाबाधितांची संख्या आता ७८ लाख १४ हजार ६८२ वर

संग्रहीत छायाचित्र

देशातील करोना प्रादुर्भावाचा वेग हळूहळू कमी होत असला, तरी अद्यापही नवे रुग्ण मोठ्या संख्येने आढळत आहेत. शिवाय, मृतांच्या संख्येतही भर पडत असल्याचे दिसत आहे. मागील २४ तासांमध्ये देशभरात ५३ हजार ३७० नवे करोनाबाधित आढळले, तर ६५० रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला असल्याचे समोर आले आहे. याचबरोबर देशातील एकूण करोनाबाधितांची संख्या आता ७८ लाख १४ हजार ६८२ वर पोहचली आहे.

देशातील एकूण ७८ लाख १४ हजार ६८२ करोनाबाधितांच्या संख्येत ६ लाख ८० हजार ६८० अॅक्टिव केसेस, डिस्चार्ज मिळालेले ७० लाख १६ हजार ४६ जणांचा समावेश आहे.

२३ ऑक्टोबर पर्यंत देशात १०,१३,८२,५६४ नमून्यांची करोनाच्या पार्श्वभूमीवर तपासणी करण्यात आली. ज्यापैकी १२ लाख ६९ हजार ४७९ नमने काल तपासण्यात आले. आयसीएमआर कडून ही माहिती मिळाली आहे.

देशातील करोनाची स्थिती निश्चित कशी आहे हे ठरविण्याच्या दृष्टिकोनातून पुढील तीन महिने निर्णायक ठरणार आहेत, असे केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी शुक्रवारी सांगितले. आगामी उत्सवांचा काळ आणि हिवाळ्यात जनतेने कोविड-१९ बाबत योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहनही आरोग्यमंत्र्यांनी केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 24, 2020 9:55 am

Web Title: with 53 370 new covid19 infections indias total cases surge to 7814682 msr 87
टॅग Coronavirus
Next Stories
1 हाथरसमध्ये अल्पवयीन मुलांकडून चार वर्षीय चिमुकलीवर बलात्कार!
2 केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून पूर्व परीक्षा २०२० चा निकाल जाहीर
3 “बिगरभाजपा राज्यांतील सरकारांनी पुतीनकडून लस मागवायची काय?”
Just Now!
X