26 November 2020

News Flash

देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या ७६ लाखांचा पुढे ; ५४ हजार ४४ नवे रुग्ण

मागील २४ तासांमध्ये ७१७ जणांचा मृत्यू

संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र

देशातील करोना प्रादुर्भावाचा वेग काहीसा मंदावलेला असला तरी, अद्यापही करोनाबाधितांची व करोनामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येत भर पडतच आहे. देशभरातील एकूण करोनाबाधितांच्या संख्येने आता ७६ लाखांचा टप्पा देखील ओलांडला आहे. मागील २४ तासांमध्ये देशात ५४ हजार ४० नवे करोना रुग्ण आढळले, तर ७१७ मृत्यूंची नोंद झाली आहे. याचबरोबर एकूण करोनाबाधितांची संख्या आता ७६ लाख ५१ हजार १०८ वर पोहचली आहे.

देशातील करोनाबाधितांची एकूण ७६ लाख ५१ हजार १०८ करोनाबाधितांमध्ये ७ लाख ४० हजार ९० अॅक्टिव्ह केसेस, डिस्चार्ज मिळालेले ६७ लाख ९५ हजार १०३ जण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या १ लाख १५ हजार ९१४ जणांच्या संख्येचा समावेश आहे.

मागील २४ तासांमध्ये ६१ हजार ७७५ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर, ८ हजार ४४८ अॅक्टिव्ह केसेस कमी झाल्या आहेत.
२० ऑक्टोबरपर्यंत देशभरात ९,७२,००,३७९ नमूने तपासण्यात आले. त्यापैकी १० लाख ८३ हजार ६०८ नमूने काल तपासण्यात आले. आयसीएमआरकडून ही माहिती समोर आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 21, 2020 10:02 am

Web Title: with 54044 new covid19 infections indias total cases surge to 76 51108 msr 87
टॅग Coronavirus
Next Stories
1 जगातील सर्वात प्रभावशाली देशांच्या यादीतून भारत बाहेर
2 वर्क फ्रॉम होमचा तणाव सहन होईना, इंजिनिअरची गळफास घेऊन आत्महत्या
3 सर्व दहशतवादी मदरशांमध्येच वाढले आहेत – उषा ठाकूर
Just Now!
X