News Flash

अपहरणकर्ते ट्रॅफिकमध्ये अडकले; सातव्या मिनिटाला पोलिसांच्या लागले हाती

अपहरण झालेल्या मुलाच्या भावाने पोलिसांना फोन करुन दिली माहिती

अपहरणकर्ते ट्रॅफिकमध्ये अडकले

दिल्ली पोलिसांनी रविवारी काही अपहरणकर्त्यांना अटक केली. येथील मोहन गार्डन परिसरामधून पोलिसांनी या अपघहरणकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. विशेष म्हणजे या अपहरणकर्ते दिल्लीच्या वाहतूककोंडीमध्ये अडकल्याने पोलिसांच्या हाती लागल्याने ही अटक चर्चेचा विषय ठरली आहे.

दिल्ली पोलिस उपायुक्त सहरत कुमार सिन्हा यांनी दिलेल्या माहितीनुसार २१ वर्षीय रिजवाल या तरुणाचे अपहरण करण्यात आले. अपहरण झाल्याचे समजताच रिजवालच्या भावाने पोलिसांना अपहरण झाल्याची माहिती दिल्यानंतर सातव्या मिनिटाला अपरहरणकर्त्यांना अटक करण्यात आली. ‘चार जणांनी माझ्या भावाने जनकपुरी येथून अपहरण केले आहे’ अशी पोलिसांना रिजवालच्या भावाने दिली. तसेच ज्या गाडीमधून अपहरण करण्यात आले त्या गाडीच्या समोरील भागावर ‘हाय लॅण्डर’ असं लिहिलेलं होतं अशी खूण या व्यक्तीने पोलिसांनी सांगितली. पोलिसांनी नियंत्रण कक्षामधून यासंदर्भातील माहिती पेट्रोलींग करणाऱ्या पोलिसांना दिली आणि गाडीचा शोध घेण्यास सुरुवात झाली. काही मिनिटांमध्येच विंडशील्डवर (गाडीची पुढील काच) ‘हाय लॅण्डर’ असं लिहिलेलं गाडी त्यांना उत्तम नगर परिसरामध्ये एका सिग्नलजवळ वाहतूककोंडीत अडकलेली अढळली. पोलीस आपला पाठलाग करत असल्याचे समजताच अपहरणकर्त्यांपैकी तीन जणांनी नजाफगड रस्त्याच्या सिग्नलजवळ गाडीमधून उतरुन पळ काढला. पोलिसांनी गाडी चालवणाऱ्या अपहरणर्त्याला अटक करुन मुलाची सुटका केली. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव रवी असे असून तो उत्तम नगरचा रहिवासी आहे.

मूळचा शिमल्याचा असणाऱ्या रिजवालने अपहरणकर्त्यांनी आपल्याला मोहन गार्डनजवळ बळजबरीने गाडीमध्ये बसवल्याचा जबाब पोलिसांकडे नोंदवला. रिजवालच्याच गाडीमध्ये त्याचे अपहरण करण्यात आल्याने त्याच्या भावाने गाडी ओळखण्याची खूण अचूक सांगितली होती. पोलिसांनी या गाडीमधून एक हजार ६०० रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 22, 2019 9:57 am

Web Title: with kidnappers car stuck in delhi traffic youth rescued within 7 minutes scsg 91
Next Stories
1 शिवसेनेतर्फे १० रुपयांत थाळी, ‘साहेब खाना’ योजना सुरू
2 फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपवर सरकारनं लावला कर; नागरिकांनी केलं हिंसक आंदोलन
3 केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा वाढदिवस, मोदी म्हणाले…
Just Now!
X