अहमदाबादच्या एसजी हायवेवरील वायएमसीए क्लब जवळच्या पॉश वसाहतीत राहणाऱ्या एका महिलेने नवऱ्यावर आणि सासू-सासऱ्यांवर शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप केला आहे. महिलेने नवऱ्यावर फसवणुकीचा तसेच वाईफ स्वॅपिंगचा गंभीर आरोप केला आहे. नवरा वाईफ स्वॅपिंगसाठी जबरदस्ती करत होता, अखेर या महिलेने पोलिसात तक्रार नोंदवण्याचे पाऊल उचलले.
नवरा आपल्यावर त्याच्या मित्रांसोबत शरीरसंबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती करतो, असा आरोप या महिलेने केला आहे. याला वाईफ स्वॅपिंगचा प्रकार म्हणतात. महिला पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार नोंदवण्यात आली आहे. पीडित महिलेचे २००४ साली लग्न झाले होते. त्यांना ११ वर्षांचा मुलगा सुद्धा आहे. लग्नानंतर काही वर्ष सर्व काही सुरळीत सुरु होते. अहमदाबाद मिररने हे वृत्त दिले आहे.
पण २०१७ साली तिला नवऱ्याचे दोन महिलांसोबत विवाहबाह्य संबंध असल्याचे समजले. त्यानंतर त्यांच्यात भांडणे सुरु झाली. नवरा आपल्यावर वाइफ स्वॅपिंगतंर्गत त्याच्या मित्रांसोबत शरीरसंबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती करायचा, असा आरोप पीडित महिलेने केला आहे. मी नकार दिल्यानंतर मला अपशब्द सुनावायचा तसेच मला चरित्रहिन ठरवून मोकळा व्हायचा, असे महिलेने म्हटले आहे. यावर्षी जानेवारी महिन्यात त्याने मुलाला नातेवाईकाकडे पाठवून दिले व पत्नीकडे घटस्फोटाची मागणी केली असे तिने तक्रारीत म्हटले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 15, 2020 2:29 pm