News Flash

RSS स्वयंसेवकाने घरात घुसून बलात्कार केला; महिलेच्या आरोपानं खळबळ

बंदुकीचा धाक दाखवल्याचा दावा

प्रतिनिधिक छायाचित्र

देशभरात महिलाविरोधातील हिंसाचाराचा मुद्दा सातत्यानं ऐरणीवर आहे. अशातच एका महिलेनं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकावर बलात्काराचा आरोप केला आहे. घरात घुसून बंदुकीचा धाक दाखवत स्वयंसेवकाने बलात्कार केल्याचा दावा महिलेनं केला आहे. याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.

उत्तर प्रदेशातील आग्राजवळ असलेल्या फिरोझाबादमध्ये ही घटना घडली आहे. शहरातील एका महिलेनं पोलिसांत फिर्याद नोंदवली आहे. एक स्थानिक आरएसएस स्वयंसेवक अधूनमधून महिलेच्या घरी यायचा. एक दिवस त्याने फिर्यादी महिलेचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी महिलेनं विरोध करत त्याला घरातून निघून जाण्यास सांगितलं. त्याचबरोबर परत कधीच घरी न येण्याचा इशारा दिला.

आरएसएस स्वयंसेवक असलेली ती व्यक्ती काही दिवसानंतर अचानक त्या महिलेच्या घरात घुसली. फिर्यादी महिलेसोबत जबरदस्ती केली. तिच्या डोक्याला बंदूक लावत आरोपीनं बलात्कार केला. अत्याचार करत असताना महिलेनं आरडाओरड केल्यानं तिच्या बहिणीचा पती आवाज ऐकून धावत आली. यावेळी आरोपीनं आपण आरएसएस स्वयंसेवक असून, आपलं कुणीच काहीही करू शकत नाही, असं म्हणत निघून गेला, असं महिलेनं फिर्यादीत म्हटलं आहे.

याप्रकरणी पोलीस ठाण्याचे प्रमुख रामचंद्र कुमार शुक्ला यांनी सांगितलं की, महिलेनं पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. घटनेचा तपास सुरू करण्यात आला आहे. जर तक्रारीत तथ्य आढळून आल्यास आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल. ती व्यक्ती जर दोषी असेल, तर मग ती आरएसएस स्वयंसेवक असो अन्य कुणी कारवाईवर कोणताही परिणाम होणार नाही, अस शुक्ला यांनी म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 28, 2020 8:41 am

Web Title: woman accuses rss volunteer of raping her at gunpoint bmh 90
Next Stories
1 शरद पवार युपीएचे नवे अध्यक्ष? पी चिदंबरम यांची महत्वाची प्रतिक्रिया; म्हणाले…
2 चंद्रकांत पाटील यांनी शेअर केला मोदींचा फोटो, म्हणाले, “असा तेजस्वी पंतप्रधान भारताला…”
3 नितीश कुमार म्हणतात, “मी दबावाखाली मुख्यमंत्री पद स्वीकारलं; कोणालाही मुख्यमंत्री बनवा मला…”
Just Now!
X