28 September 2020

News Flash

फेसबुकवरच्या ओळखीतून तरुणीवर बलात्कार

एका २३ वर्षीय तरुणीने बलात्काराचा आरोप केला आहे. पीडित तरुणीची सोनूबरोबर फेसबुकवरुन ओळख झाली होती.

उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्यात एका २३ वर्षीय तरुणीने बलात्काराचा आरोप केला आहे. सोनू आणि त्याच्या भावाने मिळून आपल्यावर बलात्कार केला असे पीडित महिलेने तिच्या तक्रारीत म्हटले आहे.

पीडित तरुणीची सोनूबरोबर फेसबुकवरुन ओळख झाली होती. आरोपी सोनूने आपल्याला हॉटेलमधल्या रुमवर ठेवले होते. आरोपीने बलात्काराचे चित्रीकरणही केले. सोनू लग्नासाठी जबरदस्ती करण्यासाठी या चित्रीकरणाचा वापर करत होता असे पीडित महिलेने म्हटले आहे.

सोनूने त्याचा धर्म सुद्धा आपल्यापासून लपवून ठेवला असे या महिलेने तक्रारीत म्हटले आहे. शामलीचे पोलीस अधीक्षक अजय पांडे यांच्या आदेशावरुन सोनू आणि त्याच्या १० कुटुंबियांविरोधात दंड विधान संहितेच्या विविध कलमातंर्गत तक्रार दाखल केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 4, 2019 6:30 pm

Web Title: woman alleges rape by man she met on facebook
Next Stories
1 ‘वेल डन’; निर्मला सीतारमनजी
2 भय्यूजी महाराज यांची आत्महत्या नव्हे हत्याच-रामदास आठवले
3 बोफोर्समुळे तुमची सत्ता गेली, राफेल मोदींना जिंकून देईल – निर्मला सीतारमन
Just Now!
X