377 कलम लागू झाल्यानंतर पहिल्यांदाच समलैंगिक बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. 19 वर्षीय तरुणीवर 25 वर्षीय तरुणीचा बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सेक्स टॉयच्या मदतीने हा बलात्कार केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी पीडित तरुणीवर बलात्कार आणि ब्लॅकमेल केल्याप्रकरणी चौघांना अटक केली आहे. यामध्ये आरोपी तरुणीचाही समावेश आहे.

आरोपी तरुणीवर 377 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने समलैंगिकतेला गुन्हा ठरवणारे कलम 377 बेकायदेशीर ठरवल्यानंतर पहिल्यांदाच असा गुन्हा दाखल झाला आहे. सप्टेंबर महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने हा ऐतिहासिक निर्णय सुनावला होता. पोलिसांनी आरोपी तरुणीला न्यायालयात हजर केलं असता एक दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली. यानंतर तिची तिहार जेलमध्ये रवानगी करण्यात आली.

गतवर्षी सप्टेंबर महिन्यात हे प्रकरण उघडकीस आलं होतं. त्यावेळी पोलिसांनी महिला बलात्कार करु शकत नाही असं सांगत कलम 377 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यास नकार दिला होता. कामानिमित्त दिल्लीत स्थायिक झालेल्या पीडित तरुणीने आरोपीने आपल्यावर बलात्कार केला तसंच वारंवार अत्याचारही केले असा आरोप केला आहे.

आरोपांनुसार, पीडित तरुणीला दिल्लीमधील दिलशाद कॉलनीत नेण्यात आलं आणि तिथे सामूहिक बलात्कार करण्यात आला. पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.