News Flash

वृद्ध सासूला सुनेने विटेने मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल

या प्रकरणी संगीता जैन हिला मंगळवारी सकाळी उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केली

वयस्कर सासूला तिच्याच सुनेने घरामध्ये विटेच्या साह्याने बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सुनेकडून सासूचा छळ होतोय का, हे पाहण्यासाठी तिच्या नवऱ्यानेच गुप्तपणे घरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरा लावला होता. त्यामध्ये ही मारहाण कैद झाली आहे.

या प्रकरणी संगीता जैन हिला मंगळवारी सकाळी उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केली. राजराणी जैन या सासूला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप तिच्यावर ठेवण्यात आला आहे. बिजनोरमधील घरामध्ये गेल्या पाच तारखेला दोघी जणी घरात एकट्याच असताना हा प्रकार घडला. त्यामध्ये सासू पलंगावर बसलेली असताना मागून येऊन संगीता हिने तिचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर कपड्यात बांधलेल्या विटेच्या साह्याने तिला डोक्यामध्ये जोरदार मारहाण केली.
संगीता हिचा सात वर्षांपूर्वी संदीप जैन यांच्याशी विवाह झाला. तिने काही दिवसांपूर्वीच नवऱ्याविरोधात हुड्याची, छळवणूक केल्याची तक्रार दाखल केली आहे. नवऱ्याकडे तिने घटस्फोटाचीही मागणी केली असून, त्याचा खटला न्यायालयात सुरू आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 12, 2016 11:41 am

Web Title: woman assaults mother in law in uttar pradesh
Next Stories
1 हल्लेखोरांना जशास तसे उत्तर!
2 गडकरींशी आर्थिक हितसंबंधांमुळे ‘आयआरबी’ला दहा हजार कोटींचे कंत्राट
3 ‘पठाणकोट’च्या तपासासाठी संयुक्त चौकशी पथकाची स्थापना
Just Now!
X