26 February 2020

News Flash

कामांध प्रेयसीनं लावली झोपाळू प्रियकराच्या घराला आग

'चार वाजता सेक्स करण्यासाठी घरी ये' अशी मागणी त्याने फोनवर केली पण...

(प्रातिनिधिक फोटो)

अमेरिकेमधील न्यू जर्सीमधील एका तरुणीवर तिच्या प्रियकराचे घर जाळल्याचा आरोप करण्यात आला आहे. प्रियकराने या तरुणीला रात्री उशीरा फोन करुन ‘पहाटे चार वाजता सेक्स करण्यासाठी घरी ये’ अशी मागणी केली. मात्र ही तरुणी जेव्हा त्याच्या घरी पोहचली तेव्हा तो झोपी गेल्याने त्याने घराचा दरवाजा उघडला नाही. रागाच्याभरात या तरुणीने प्रियकराच्या घरालाच आग लावली.

स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तरुणीचे नाव ताईजा रस्सेल असे आहे. या २९ वर्षीय तरुणीने जवळच्या पेट्रोल पंपावरुन पेट्रोल आणून ते प्रियकराच्या घरावर टाकत आग लावली. घराच्या पुढील भागात पेट्रोल टाकून आग लावल्यानंतर आगीच्या ज्वाला वाढू लागल्यानंतर तीने घटनास्थळावरुन पळ काढल्याचेही पोलिसांनी सांगितले आहे. घरामध्ये झोपलेल्या या तरुणीच्या प्रियकराला घराला आग लागल्याचे साडेचारच्या सुमारास लक्षात आले. झोपेतून उठल्यानंतर घराचा पुढचा भाग आगीच्या भक्षस्थानी पडल्याचे त्याला दिसले. दरवाजालाच आग लावण्यात आल्याने त्याने खिडकीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. बऱ्याच प्रयत्नानंतर त्याला घराच्या खिडकीच्या काचा फोड्यात यश आले. आग घरभर पसरण्याआधी बाहेर पडल्याने थोड्यात त्याचा जीव वाचला. घराबाहेर पडला तेव्हा या तरुणाच्या अंगावर केवळ टी-शर्ट आणि अंतर्वस्त्रे होती. राखेने माखलेल्या अंगानेच या तरुणाने वूडब्लरी पोलीस स्थानकांमध्ये धाव घेतल्याचे ‘युएसए टुडे’ने आपल्या वृत्तामध्ये म्हटले आहे.

या तरुणाने पोलीस स्थानकांमधील अधिकाऱ्यांना घडलेल्या प्रकराची माहिती दिली आणि तो पुन्हा घराकडे धावला. पोलिसांनी या घटनेची माहिती अग्निशामन दलाला दिल्याने काही वेळातच ते घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी आग विझवली. पोलिसांनी या तरुणाला जवळच्या रुग्णालयात दाखल केले असून त्याला श्वसनाचा त्रास होत होता तसेच त्याला काही ठिकाणी चटकेही बसल्याने त्याच्यावर उपचार करण्यात आले.

आग कशी लागली यासंदर्भात पोलिसांनी तरुणाकडे चौकशी केली असता त्याने संपूर्ण घटनाक्रम सांगितला. मी या तरुणीला फोन करुन ‘सेक्स करण्यासाठी पहाटे चार वाजता घरी ये’ असं सांगितल्याची माहिती पोलिसांना दिली. मागील अनेक काळापासून माझे आणि तरुणीचे संबंध आहेत असं त्याने पोलिसांनी सांगितले. यानंतर पोलिसांनी घराबाहेरील सीसीटीव्हीमधील फुटेज तपासले असता एका तरुणीनेच घराला आग लावल्याचे दिसून आले. त्यानंतर पोलिसांनी ताईजाला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तिने गुन्ह्याची कबुली दिली. या प्रकरणात पोलिसांनी या तरुणीवर खुनाचा प्रयत्न, जाळपोळ करणे, एखाद्याचा जीव धोक्यात घालणे आणि गुन्हेगारी कृत्याने एखाद्याचा छळ करण्याच्या गुन्ह्यांखाली अटक करण्यात आली आहे.

First Published on August 21, 2019 12:38 pm

Web Title: woman burns down mans house after he called her for sex at 4 am but fell asleep scsg 91
Next Stories
1 इम्रान खान यांची मोदींशी छुपी डील; इम्रान यांच्या दुसऱ्या पत्नीचा दावा
2 ट्रम्प म्हणतात, काश्मीरमध्ये स्फोटक परिस्थिती; पुन्हा दिला मध्यस्थीचा प्रस्ताव
3 चिदंबरम यांची डोकेदुखी ठरलेले INX मीडिया प्रकरण आहे तरी काय ?
Just Now!
X