News Flash

धक्कादायक! १३९ जणांनी बलात्कार केल्याचा तरुणीचा आरोप; तक्रारीत वकील, राजकारण्यांच्या पीएची नावं

पोलिसांनी ४२ पानी एफआयआर दाखल केला आहे

प्रतिकात्मक फोटो

हैदराबादमधील तरुणीने आपल्यावर जवळपास १३९ जणांनी बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. तेलंगणमधील २५ वर्षीय तरुणीने हा आरोप केला असून याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तरुणीने तक्रारीत विद्यार्थी नेते, राजकारण्यांचे स्वीय सहाय्यक, वकील, पत्रकार, व्यवसायिक तसंच इतरांचा उल्लेख केला आहे. गेल्या काही वर्षात आपल्यावर लैंगित अत्याचार करण्यात आल्याचा तरुणीचा दावा आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिलं आहे.

तरुणीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी ४२ पानी एफआयआर दाखल केला आहे. दरम्यान तरुणीला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आलं आहे. संबंधित २५ वर्षीय तरुणीने दिलेल्या माहितीनुसार, २००९ मध्ये आपलं लग्न झालं होतं. लग्नानंतर एकाच वर्षात घटस्फोट झाला. त्यावेळी २० जणांनी आपल्यावर लैंगिक अत्याचार केले होते, ज्यामध्ये कुटुंबातील काही सदस्य होते असंही तरुणीने तक्रारीत म्हटलं आहे.

आणखी वाचा- वयामध्ये अंतर, दोन प्रियकरांच्या मदतीने बायकोने संपवलं नवऱ्याला

घटस्फोट झाल्यानंतर पुढील शिक्षण घेण्यासाठी आई-वडिलांकडे गेले असता तिथेही अनेकांनी लैंगिक अत्याचार केले. तसंच पोलिसांना सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचा तरुणीचा आरोप आहे. आरोपींनी आपल्याला सिगारेटचे चटके दिल्याचंही तरुणीचं म्हणणं आहे. मिळणाऱ्या धमक्या आणि भीतीपोटी पोलीस तक्रार करण्यात उशीर झाल्याचं तरुणीचं म्हणणं आहे. पोलिसांनी एफआयआर दाखल केला असून तपास सुरु आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 22, 2020 4:46 pm

Web Title: woman claims she was raped by 139 people in hyderabad sgy 87
Next Stories
1 वयामध्ये अंतर, दोन प्रियकरांच्या मदतीने बायकोने संपवलं नवऱ्याला
2 १६ दिवसात आढळले १० लाख रूग्ण; भारतात अमेरिका, ब्राझीलपेक्षाही रुग्ण वाढीचा वेग जास्त
3 दक्षिण चीन समुद्र: चीनकडून बॉम्बर विमाने तैनात, व्हिएतनामने भारताला दिली बिघडणाऱ्या स्थितीची माहिती
Just Now!
X