बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्याचं तरुणीने गुप्तांग कापल्याची घटना पाकिस्तानात समोर आली आहे. तरुणीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, आपण घरात एकटे असताना आरोपीने घरात प्रवेश केला. महिला पंजाब प्रांतात वास्तव्यास आहे. आरोपीने घरात प्रवेश करताच आपल्यावर बलात्काराचा प्रयत्न केला. यामुळे आपण किचनकडे धाव घेतली आणि बचावासाठी चाकू हातात घेतला. नंतर चाकूच्या सहाय्याने आरोपीचं गुप्तांग कापलं अशी माहिती २५ वर्षीय तरुणीने दिली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
आरोपीला सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यार सध्या उपचार सुरु आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि तरुणी एकमेकांना ओळखत होते. आरोपीचं लग्न ठरलं होतं. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
पाकिस्तानात दरवर्षी अनेक महिलांवर बलात्कार झाल्याच्या घटना घडतात. पण अनेकदा पीडित महिला पुढे येत नसल्याने आरोपी कोणत्याही शिक्षेविना मोकाट फिरतात. पाकिस्तानात ७० ते ९० टक्के महिलांना आपल्या आयुष्यात घरगुती हिंसाचार आणि वैवाहिक बलात्काराला सामोरं जावं लागतं.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 8, 2020 4:28 pm