24 January 2021

News Flash

धक्कादायक! तरुणीला कारबाहेर खेचून १० जणांनी केला सामूहिक बलात्कार

एका २१ वर्षीय तरुणीवर दहा जणांनी मिळून सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शनिवारी रात्री पीडित महिला तिच्या एका मित्रासमवेत गाडीमधून चालली होती.

प्रतिनिधिक छायाचित्र

पंजाबमध्ये एका २१ वर्षीय तरुणीवर दहा जणांनी मिळून सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. लुधियानापासून १५ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या इस्सेवाल गावातील सीदवान कालव्याजवळ या तरुणीवर अत्याचार करण्यात आला. शनिवारी रात्री पीडित महिला तिच्या एका मित्रासमवेत गाडीमधून चालली असताना दुचाकीवरुन आलेल्या आरोपींनी त्यांची गाडी रोखली.

आरोपींनी या तरुणीला खेचत गाडीबाहेर काढले व तिच्यावर बलात्कार केला असे पोलीस अधीक्षक तरुण रतन यांनी सांगितले. आरोपी तीन दुचाकीवरुन आले होते. गाडी थांबल्यानंतर आरोपींनी दगड आणि विटा गाडीवर फेकून मारल्या. आरोपींनी त्यानंतर तरुणीला व तिच्या मित्राला खेचून गाडी बाहेर काढले व त्यांना कालव्याजवळ निर्जन स्थळी घेऊन गेले.

आरोपींनी तिथे आणखी सहा ते सात जणांना बोलावले व या सर्वांनी मिळून तरुणीवर सामूहिक बलात्कार केला. तरुणी आणि तिच्या मित्राला तिथे रविवारपर्यंत बंधत बनवून ठेवले होते. रुग्णालयात झालेल्या वैद्यकीय चाचणीनंतर पीडित महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आयपीसीच्या विविध कलमांखाली पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून आरोपींचा शोध सुरु केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 12, 2019 9:05 am

Web Title: woman dragged from car raped by 10 men in punjab
Next Stories
1 दिल्लीत अर्पित पॅलेस हॉटेलच्या आगीत १७ जणांचा मृत्यू
2 राम मंदिरासाठी 17 फेब्रुवारीला अयोध्येकडे कूच, शंकराचार्य सरस्वतींची घोषणा
3 शिवसेनेला मोठेपणा हवा! शहा -उद्धव यांच्यात चर्चा
Just Now!
X