18 February 2020

News Flash

भरधाव कारने धडक दिल्यानंतर तरुणी फ्लायओव्हरवरुन खाली पडली आणि…

धडक इतकी जबरदस्त होती की तरुणी हवेत फेकली गेली आणि फ्लायओव्हरवरुन खाली पडली

अपघातानंतर 20 वर्षीय तरुणी फ्लायओव्हरवरुन खाली पडूनही चमत्कारिकपणे बचावली असल्याची घटना दिल्लीत घडली आहे. सोमवारी संध्याकाळी विकासपुरी फ्लायओव्हरवर ही घटना घडली. तरुणी दुचाकीवरुन जात असताना अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणीची ओळख पटली असून तिला काही फ्रॅक्चर आहेत. मात्र सध्या तिला कोणताही धोका नाही.

पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध घेतला जात आहे. प्राथमिक तपासानुसार, सपना दुचाकीवरुन आपल्या दोन मित्रांसोबत पश्चिम विहार येथून जनकपुरीला जात होती. सपना आपले मित्र कुणाल आणि जिया यांच्यासोबत ट्रिपल सीट प्रवास करत होती. कुणाल दुचाकी चालवत होता. जिया त्याच्या मागे आणि शेवटी सपना बसलेली होती.

आपल्या एका मित्राला भेटण्यासाठी तिघे जात होते. दुचाकीवरुन जात असताना एक दुचाकी त्यांच्या अगदी जवळून गेली ज्यामुळे दुचाकीचा तोल जाऊ लागला. याचवेळी भरधाव वेगात असणाऱ्या एका चारचाकीने त्यांचा दुचाकीला धडक दिली. धडक इतकी जबरदस्त होती की, सपना हवेत फेकली गेली आणि फ्लायओव्हरवरुन खाली पडली. तिचे दोन्ही मित्र बॅरिअरला धडकून जखमी झाले.

फ्लायओव्हरखाली असणाऱ्या सीसीटीव्हीत ही घटना कैद झाली आहे. सीसीटीव्हीत सपना फ्लायओव्हरवरुन खाली पडताना दिसत आहे. सुदैवाने सपना रस्त्यावर पडली नाही आणि कोणतंही वाहन तेथून जात नव्हतं. सपना खाली पडताच तिथे उपस्थित असणाऱ्यांनी मदतीसाठी धाव घेतली.

सपना आणि तिच्या मित्रांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सपनाला गंभीर जखमा झाली नसून काही ठिकाणी फ्रॅक्चर झालं आहे. उपचारानंतर त्यांना सोडून देण्यात आलं.

First Published on February 19, 2019 1:21 pm

Web Title: woman falls from flyover after accident survives
Next Stories
1 SC/ST Act: सुधारित कायद्याविरोधातील याचिकांवर २६ मार्चपासून अंतिम सुनावणी
2 Pulwama encounter: सुट्टी अर्ध्यावर सोडून ब्रिगेडियरने केले गाझीला संपवण्याच्या मिशनचे नेतृत्व
3 देशभरातील काश्मिरी जनतेच्या सुरक्षेसाठी आम्ही कटिबद्ध : सीआरपीएफ
Just Now!
X