पतीसमोर महिलेवर १७ जणांकडून सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित महिला पतीसोबत बाजारातून परतत असताना हा प्रकार घडला. झारखंडमधील डुमका येथे ही घटना घडली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सध्या एका आरोपीला अटक करण्यात आलेली असून इतर १६ जण फरार आहेत.
पीडित महिला पाच मुलांची आई आहे. पीडित महिलेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, “मंगळवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास पतीसोबत आपण बाजारातून परतत असताना सर्व १७ आरोपी तिथे हजर होते. त्यांनी आम्हाला थांबवलं. ते सर्व दारुच्या नशेत आहेत. त्यांनी माझं अपहरण केलं आणि ओढत जवळच्या झाडीत नेलं. यावेळी इतरांनी पतीला धरुन ठेवलं होतं. यानंतर आळीपाळीने बलात्कार करण्यात आला”.
आणखी वाचा- धक्कादायक! जेवणाला हात लावला म्हणून दलित तरुणाची हत्या
पीडित महिलेला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आलं आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून एका आरोपीला अटक केली आहे. इतर १६ आरोपी फरार आहेत. डीआयजी सुदर्शन मंडल यांनी एकाही आरोपीला सोडलं जाणार नाही असं सांगितलं आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 10, 2020 10:17 am