दिल्लीत द्वारका येथे एका बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी करणाऱ्या महिलेवर दोन सहकाऱ्यांनीच सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शनिवारी रात्री ही घटना घडली. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे. दोन्ही आरोपींची ओळख पटली असून बिरजू (२५) आणि विनोद कुमार (३१) अशी आरोपींची नावे आहेत.
पीडित महिला शनिवारी संध्याकाळी ऑफिसमधून बाहेर पडल्यानंतर दोघांनी तिला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने गाडीत बसवले. प्रवासादरम्यान दोघांनी तिला पिण्यासाठी शीतपेय दिले. त्यामध्ये गुंगीचे औषध मिसळलेले होते. शीतपेय प्याल्यानंतर ही महिला बेशुद्ध झाली. त्यानंतर आरोपी तिला विनोद कुमारच्या फ्लॅटवर घेऊन गेले व तिथे दोघांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.
आपला हेतू साध्य केल्यानंतर दोन्ही आरोपींनी तिला वसंत कुंज येथील तिच्या घराबाहेर सोडले. द्वारका पोलिसांनी ही माहिती दिली. दुसऱ्या एका घटनेत शनिवारी रात्रीच विनोद नगर परिसरात एका १६ वर्षीय विद्यार्थीनीवर चौघांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 15, 2018 2:20 pm