19 September 2020

News Flash

पत्नीच्या तीन प्रियकरांच्या छळाला कंटाळून नवऱ्याची आत्महत्या

नवऱ्याला आत्महत्येला भाग पाडल्या प्रकरणी पोलिसांनी पत्नीसह तिच्या तीन प्रियकरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

प्रतिनिधिक छायाचित्र

नवऱ्याला आत्महत्येला भाग पाडल्या प्रकरणी गुजरातच्या गांधीधाम पोलिसांनी पत्नीसह तिच्या तीन प्रियकरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. प्रल्हाद नावाच्या व्यक्तीने तीन महिन्यांपूर्वी आत्महत्या केली होती. पोलिसांनी या प्रकरणी धानबाई माहेश्वरी, नरसिन्ह कोली, रवी शंकर माहेश्वरी आणि महेश माहेश्वरी या तिघांविरोधात सोमवारी गुन्हा दाखल केला.

प्रल्हादने गांधीधाम येथील घरी असताना इलेक्ट्रीकचा शॉक घेऊन आत्महत्या केली होती. प्रल्हादच्या बहिणीचा नवरा लालजीने या आत्महत्येबद्दल संशय व्यक्त करत चौकशी करण्याठी पोलिसांकडे तक्रारीचा अर्ज दिला होता. प्रल्हादला धानबाईच्या अनैतिक संबंधांबद्दल समजले होते. प्रल्हादला कळल्यानंतर चारही आरोपी त्याला धमकावायचे. त्यांनी छळ सुरु केला होता.

प्रल्हाद हे सर्व सहन करु शकला नाही व त्याने १३ सप्टेंबरला इलेक्ट्रीकचा शॉक घेऊन आत्महत्या केली असे या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांनी सांगितले. नरसिन्ह, रवी आणि महेश तिघेही प्रल्हाद घरी असताना यायचे व त्याला धमकावायचे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 19, 2018 12:56 pm

Web Title: woman her 3 lovers booked for husband suicide
Next Stories
1 स्मृती इराणींना दिलासा, संजय निरुपम यांची अब्रुनुकसानीची याचिका फेटाळली
2 पंतप्रधान मोदींना बोलण्यासाठी स्क्रिप्टची गरज नसते; नक्वींचे मनमोहनसिंगांना उत्तर
3 …म्हणून ISRO च्या जीसॅट-७ ए चे प्रक्षेपण एअर फोर्ससाठी अत्यंत महत्वाचे
Just Now!
X