News Flash

धक्कादायक ! महिलेची अल्पवयीन प्रियकरासोबत काढण्यात आली धिंड

दोघे प्रेमसंबंधात असल्यामुळे ही धिंड काढण्यात आली

हरियाणामध्ये महिला आणि अल्पवयीन मुलाची गावात धिंड काढल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दोघे प्रेमसंबंधात असल्यामुळे ही धिंड काढण्यात आली. यावेळी दोघांच्या गळ्यात चपलांचा हार घालण्यात आला होता. कारनाल येथील दनियालपूर गावात ही घटना घडली आहे. स्थानिक आणि पीडितांच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, पंचायतमध्ये झालेल्या निर्णयानंतर सरपंच आणि इतरांनी दोघांना गावाबाहेर काढण्याचा निर्णय घेतला.

“महिला मूळची बिहारची असून गावात वास्तव्यास होती. मुलगा अविवाहित असून बारावीत शिकत आहे. पंचायतीची बैठक झाली, पण त्यात काय निर्णय झाला याबद्दल मला काही माहिती नाही. मी व्हायरल झालेला व्हिडीओही पाहिलेला नाही. त्यांना गावा सोडून जाण्यास सांगण्यात आलं आहे”, अशई माहिती गावातील माजी सरपंचांनी दिली आहे. महिला विवाहित असून मुलंही आहेत. महिला बंजारा समाजातील असून, मुलगा वाल्मिकी समाजातील असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.

“स्थानिकांनी मुलाच्या हत्येचा कट आखला होता. पण नंतर त्यांनी अमानुष मारहाण केली. आम्ही त्याला बस स्थानकावर सोडलं होतं. त्याने नंतर आम्हाला फोन करुन जखमी झालो असल्याचं सांगितलं”, अशी माहिती मुलाच्या काकांनी दिली आहे.

“मुलाला गरज असल्यास वैद्यकीय मदत पुरवली जाणार आहे. शक्य ती सर्व मदत त्याला दिली जाईल. जर कोणाला काही समस्या होती तर त्यांनी पोलिसांकडे तक्रार करणं अपेक्षित होतं. मारहाण करणाऱ्या तसंच गावात धिंड काढणाऱ्यांविरोधात कडक कारवाई केली जाणार आहे”, अशी माहिती पोलिस उपअधीक्षक राजीव कुमार यांनी दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 22, 2019 12:54 pm

Web Title: woman juvenile garlanded with shoes paraded haryana sgy 87
Next Stories
1 “मी कधीही इंद्राणी आणि पीटर मुखर्जीला भेटलो नाही”
2 Chidambaram Arrest: सुप्रीम कोर्ट, हायकोर्टाच्या भुमिकेवर कपिल सिब्बलांचे प्रश्नचिन्ह
3 भारताने अफगाणिस्तानात आयसिसशी दोन हात करावेत – डोनाल्ड ट्रम्प
Just Now!
X