रोजंदारीवर काम करणाऱया महिलेवर तिघांनी चालत्या कारमध्ये सामूहिक बलात्कार केल्याची घटना राजस्थानमधील अंबर गडाजवळ घडली. संबंधित महिलेच्या पतीने याप्रकरणी पोलीसांकडे गुन्हा दाखल केला आहे.
मांगिलाल रायगर असे आरोपींपैकी एकाचे नाव आहे. मांगिलाल यानेच संबंधित महिलेला रोजंदारीवर कामासाठी बोलावले होते. गेल्या शनिवारी संबंधित महिलेला गाडीमध्ये बसवल्यावर रायगर आणि अन्य दोन आरोपींनी तिच्यावर चालत्या गाडीतच बलात्कार केला. त्यानंतर निर्जनस्थळी तिला गाडीतून उतरविण्यात आले आणि घडलेला प्रकार कोणालाही न सांगण्याची धमकी देण्यात आली. पोलीसांनी भारतीय दंडविधान संहितेच्या वेगवेगळ्या कलमांनुसार आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींचा शोध घेण्यात येतो आहे.